अकोट (सारंग कराळे): अकोट तालुक्यातील बँकांनी शेतकऱ्यांचे पीक विम्याचे ऑनलाइन अर्ज संगणक सर्व्हर बंद असल्यामुले ऑफलाईन स्वीकारणेबाबत आज दिनांक २१ जुलै ला शिवसेनेचे विदर्भ संपर्क प्रमुख दिवाकर रावते,संपर्क प्रमुख खा.अरविंद सावंत,आ.गोपिकीशन बाजोरिया, सहसंपर्क प्रमुख श्रीरंगदादा पिंजरकर,जिल्हाप्रमुख नितीन बाप्पू देशमुख,मा.आ.संजय गावंडे,महिला आघाडी संपर्क संघटिका सौ.मधुराताई देसाई,जिल्हा सघंटिका प्रा.सौ.माया म्हैसने यांच्या मार्गदर्शनात न.प.सभापती मनिष कराळे यांच्या *नेतृत्वातवरील विषयाला अनुसरून *शेकडो शेतकरी बांधव तसेच शिवसैनिकांसोबत निवेदन देण्यात आले.गत काही दिवसांपासून अकोट व तेल्हारा तालुक्यातील पीक विम्याचे शेतकऱ्यांचे अर्ज हे संगणक सर्व्हर मध्ये तांत्रिक अडचणी असल्यामुळे स्वीकारणे बंद आहे तसेच शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज भरताना खूप अडचणी येत आहेत.यावर शासनाच्या आदेशानुसार सर्व राष्ट्रीयकृत तथा संबंधित कामासाठी नेमलेल्या बँकांनी हे अर्ज ऑफलाईन पद्धतीने स्वीकारून शेतकऱ्यांना होत असलेला नाहक त्रास कमी करावा.त्यात गैर कर्जदार व कर्जदार अश्या दोन्ही शेतकऱ्यांना शासनाच्या नियमानुसार जे आदेश आले असतील त्या आदेशांचे पालन संबंधित सर्व बँकांनी व कर्मचाऱ्यांनी केले पाहिजे.परंतु काही बँका शासनाच्या आदेशाला झुगारून शेतकऱ्यांना पीक विम्यापासून वंचित ठेवत आहे.तरी तहसीलदार साहेबांनी या प्रकरणात तातडीने लक्ष देऊन बँक अधिकाऱ्यांकडून आतापर्यंत पीक विम्याचे अर्ज स्वीकारल्याचा सर्व अहवाल मागवावा.कारण पीक विम्याची मुदत खूप कमी आहे त्यात शासनाच्या योजनांची तांत्रिक दृष्टया उडालेली तारांबळ ज्यामुळे आज असे चित्र आहे की अनेक शेतकरी हे पीक विम्याचे अर्ज न भरता विम्यापासून वंचित राहतील तरी हे सर्व शेतकरी वरील विषयासंबंधी वंचीत राहू नये यासाठी रविवारी बँका सुरू ठेवाव्यात.
वरील सर्व मागण्या तातडीने विचार करून पूर्ण कराव्या, यामध्ये जर कोणताही शेतकरी आज पीक विम्यापासून वंचित राहला तर ती पूर्णतःजबाबदारी ही शासनाची राहील.शेतकऱ्यांच्या हक्कासाठी शिवसेना हे रस्त्यावर उतरून आंदोलन करेल त्याचीसुद्धा सर्वस्व जबाबदारी शासनाची राहील. यावेळी जेष्ठ शिवसैनिक विजय ढेपे,कुणाल कुलट,ज्ञानेश्वर मानकर,धनराज गावंडे, रावसाहेब मुऱ्हेकार,शरद पडोळे,विक्की कराळे,बाला गांधी,प्रणव चोरे,अंकूश नागे,अमन जयस्वाल,अक्षय टेके,अतुल चिंचोळकर,राज तुरखेडे,चेतन खटोले,कृष्णा पवार,पवन खटोले,निशांत सरपे,नागेश आवारे,अंकुश नागे,अरुण अढावू,स्वप्नील अढावु,निखिल कोल्हे,सचिन इंगळे,सागर साबळे तसेच बहुसंख्य शिवसैनिक तथा शेतकरी बांधव उपस्थित होते.या निवेदनाच्या प्रतिलिपी महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री मा.चंद्रकांतदादा पाटील तसेच अकोला जिल्ह्याचे आद. जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात आल्या.