दानापूर (सुनीलकुमार धुरडे) :- अखिल भारतीय बारी महासंघाच्यावतीने २१ व २२ जुलै रोजी बारी समाजातील युवती विद्यार्थीनींसाठी प्रबोधन व संस्कार दिशादर्शक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेशचंद्र घोलप यांच्या या विधायक प्रथमच एक्लारा(बानोदा) येथे करण्यात आले आहे संग्रामपूर जळगाव तालुक्यातील युवतींनी या कार्यक्रमात बहुसंख्येने सामील होण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
एकलारा येथील खोटेश्वर महाराज विद्यालय परिसरात होणार्या या प्रशिक्षणात बारी समाजातील गुणवंतांचा सत्कार करण्यात येईल. यात २१ रोजी सकाळी ८ ते ५ युवतीकरीता प्रशिक्षण कार्यशाळा, २२ रोजी सकाळी ८ ते दुपारी १२ युवतीकरीता प्रशिक्षण कार्यशाळा, दुपारी १२ ते ३ विविध क्षेत्रातील ज्येष्ठ व तज्ञांचे मार्गदर्शन, दुपारी ३ ते ४ गुणवंतांचा सत्कार, व बक्षीस वितरण दु. ४ ते ४.३० हास्यकवी प्रमोदजी अंबडकार रा. सुनगाव ह.मु. नाशिक यांचे काव्य गायन ४.३० ते ५ मान्यवरांचा मानपत्र देवून सत्कार, यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणूनदिनेश एस.पी. कोल्हापूर डॉ. सचिन फुसे,( आयआर.एस.चंदीगड) डॉ. निलेश अस्वार (मदर टेरेसा पुरस्काराने सन्मानीत) मनोज बारी (आवृत्ती संपादक हैं. देशोन्नती जळगाव खा.), आनंद थर्ड सी.ए. पुणे, विजयराज लाडोळे कृषीमुषण अंजनगाव सुर्जी, संतोष डाबरे (एसडीओ कृषी बुलडाणा), कु. प्रीती काळपांडे सी.ए. मुंबई यांचेसह अनेक मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. तरी या कार्यक्रमाचा लाभ संग्रामपूर जळगाव तालुक्यातील युवतींनी घ्यावा. असे आवाहन बारी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेशचंद्रघोलप व संग्रामपूर तालुका बारीमहासंघाचे सर्व पदाधिकार्यांनी केले आहे.