तेल्हारा (प्रवीण वैष्णव)-शिवसेना पक्षप्रमूख उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त तेल्हारा शहरांमध्ये 20 जुलै रोजी वॉर्ड वाईस शाखेंचे उदघाटन करण्यात आले. पक्षप्रमूख उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त भगव्या सप्ताहाचे आयोजन तेल्हारा शिवसेनेच्या वतीने करण्यात आले 20 जुलै रोजी तेल्हारा शहरांमध्ये प्रमुख पाहुणे माजी आमदार संजय गावंडे शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनबाप्पू देशमुख अकोट तेल्हारा पक्ष निरीक्षक भास्करजी ठाकूर उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे गोपाल दातकर मुकेश मुरूमकर डॉ विनीत हिंगणकर तालुका प्रमुख विजय पाटील मोहोड युवासेना अकोला निवासी उपजिल्हाप्रमुख राहुल कराळे महिला जिल्हा संघटिका मायाताई म्हैसने तालुका संघटिका मीरा दही यांच्या उपस्थितीत शहरातील इंदिरा नगर प्रभाग क्र.6 जिजामाता नगर प्रभाग क्र.5 न्यू प्रताप नगर प्रभाग क्र 1 तकीया प्रभाग क्र 5 सुपिनाथ नगर येथे शिवसेनेच्या शाखेचे उदघाटन करण्यात आले शिवसेना जनसंपर्क कार्यालय श्री लटियाल भवानी प्रतिष्ठान येथे शहर व तालुक्यातील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश करण्यात आला यावेळी आलेल्या पाहुण्यांनि शिवसैनिकांना मार्गदर्शन केले तशेच युवसेनेच्या वतीने क्रीडा संकुल मधील समस्याचा बाबतीत तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले होते त्यानंतर युवसेनेच्या कार्यकर्त्यांनी याची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुखांना दिली जिल्ह्याप्रमुखांनी निवेदन दखल घेऊन विद्यार्थ्यांचा समस्या जाणून घेऊन क्षणाचा पण विलंब न करता शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन देशमुख अकोट तेल्हारा पक्ष निरीक्षक भास्करजी ठाकूर माजी आ.संजय गावंडे उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे मुकेश मुरूमकर गोपाल दातकर डॉ विनीत हिंगणकर महिला जिल्हा संघटिका मायाताई म्हैसने तालुका प्रमुख विजय पाटील मोहोड शहर प्रमुख विक्रांत शिंदे प्रसिद्धी प्रमुख प्रवीण वैष्णव माजी श प्र राजेश वानखडे पप्पूसेठ सोनटक्के निलेश मुरेकर संतोष साबळे विवेक खारोडे सुधाकर गावंडे संजय अढाऊ देवानंद फोकमारे अजय पाटील गावंडे निलेश धनभर रामभाऊ फाटकर जयवंत चिकटे बंटी राऊत सचिन थाटे राम वाकोडे सुरज देशमुख प्रज्वल मोहोड यांनी येथे जाऊन स्वतः पाहणी केली यावेळी क्रीडा संकुल परिसरात खूप मोठ्या प्रमाणात समस्या दिसून आल्या यावेळी लगेच शिवसेना जिल्ह्याप्रमुखांनी संबंधित अधिकारयाला भ्रमणध्वनीद्वारे धारेवर धरले व क्रीडा संकुल समस्या मुक्त करा अन्यथा शिवसेना स्टाईल ने उत्तर देण्यात येणार यावेळी शिवसेनेच्या व युवसेनेच्या आजी माजी पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रविण वैष्णव प्रास्तविक विजय पाटील मोहोड तर आभार विक्रांत शिंदे यांनी केले