सिरसोली(विनोद सगणे)- महाराष्ट्र शासनाच्या न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या बार्टी संस्थेमार्फत बार्टी चे महासंचालक कैलास कणसे(भा.प्र.से.)मुख्य प्रकल्प संचालिका प्रज्ञा वाघमारे सहाय्यक प्रकल्प संचालक राहुल कराळे प्रकल्प अधिकारी भाग्यश्री पाईकराव यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक १६ जुलै ते २२ जुलै हा सप्ताह समतादूत वूक्षारोपन सप्ताह म्हणून साजरा केला जात आहे या उपक्रमा अंतर्गत तेल्हारा तालुक्यातील सिरसोली येथील बाबासाहेब खोटरे विघालयात वूक्षारोपन करण्यात आले या सप्ताह निमित्त तालुक्यातील माध्यमिक विद्यालय,महाविद्यालय। शासकीय आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत कार्यालय परिसर शासकीय कार्यालय (तहसील, पंचायत समिती) शासकीय वस्तीगुह / निवासी शाळा या ठिकाणी वूक्षारोपन करण्यात येणार आहे सिरसोली येथील वूक्षारोपन कार्यक्रमात तेल्हारा तालुका समतादूत शुभांगी राजेंद्र लव्हाळे,प्राचार्य जयवंत पुंडकर,किसनराव सोलकर यांची उपस्थिती होती यावेळी समतादूत शुभांगी लव्हाळे यांनी विघार्थ्यांना वूक्षाचे महत्त्व पटवून दिले झाडे लावा झाडे जगवा अशा घोषणा देत सविस्तर मार्गदर्शन केले यावेळी खोटरे विघालयातील विघार्थी उपस्थित होते.