तेल्हारा(विशाल नांदोकार)-शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त भगव्या सप्ताह महाराष्ट्रभर राबवण्यात येत आहे या अनुषंगाने तेल्हारा शहरामध्ये भगवा सप्ताहाचे आयोजन तेल्हारा शहर शिवसेनेचा वतीने आयोजन करण्यात आले आहे व विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे या करिता दि.16-7 सोमवार रोजी शिवसेना जनसंपर्क कार्यालय श्री लटियाल भवानी प्रतिष्ठान तेल्हारा येथे आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीला शिवसेना तालुका प्रमुख विजय पाटील मोहोड व शहर प्रमुख विक्रांत शिंदे यांनी भगवा सप्ताह मोठ्या पद्धतीने कसा साजरा करता येईल यावर मार्गदर्शन केले यावेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख विजय पाटील मोहोड शहर प्रमुख विक्रांत शिंदे प्रसिद्धी प्रमुख प्रवीण वैष्णव माजी शहर प्रमुख पप्पूसेठ सोनटक्के राजेश वानखडे संतोष साबळे विवेक खारोडे निलेश धनभर अजय पाटील गावंडे निलेश मुरेकर रामभाऊ फाटकर सचिन मोरे पप्पू कामठे सुधाकर गावंडे राम वाकोडे गजानन सोनटक्के राहुल देशमुख नीलकंठ गाडगे गौतम दामोधर गॊवर्धन पवार शिवा राऊत रवी येवले मंगेश ढागे गौरव बावस्करअर्जुन धारपवार निखिल सोनटक्के विक्की वानखडे अजय गवळी अजय खोपाले सात्विक टेते व तशेच शहरातील आजी माजी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व प्रास्ताविक प्रवीण वैष्णव व आभार विवेक खारोडे यांनी केले