तेल्हारा (विशाल नांदोकार)- गेल्या काही वर्षांपासून तापडिया नगरमध्ये गोरगरीब जनता वास्तव करून राहत आहे ,तापडिया नगर अस्तित्वात आला पासून येथे कोणत्याच प्रकारचे रस्ते व नाल्या बांधण्यात आलेल्या नाही.
तिथले नागरिक वारंवार नगर पालिकेत आपले गराने मांडत आहे तर नगर पालिके कडून त्यांना एकच उत्तर देण्यात येत आहे. आपले तापडिया नगर आरक्षण खाली असल्यामुळे येथे सुविधा देऊ शकत नाही. तर तापडिया नगरमधील जनतेने एकच मागणी आहे की शहरातील विविध भागात आरक्षण आहे मग तिथले नाल्या ,रस्ते व विविध सोई पुरवण्यात येथ आहे मग आमचा सोबतच भेदभाव का?
रस्ते व नाले नसल्यामुळे आमचा लहान मुलांना शाळेत जाण्यासाठी यातना सहन करावा लागत आहे तर पावसामुळे जागोजागी साचलेला डबरांमुळे रोंगाची साथ पसरत आ.हे रस्त्यांवर सर्वत्र चिखल पसरलेला आहे. या चिखलातून नागरिकांना जाण्यायेण्या करीता चांगलीच कसरत करावी लागत आहे.
आम्हास या यातानातून रस्ते नाले बांधून बाहेर मुक्त करावे किंवा सध्याचे तात्पुरते मुरूम किंवा जाळी बारीक रेतीची रस्तावरील पाण्याचे डबर भुजवण्यात यावे करिता तापडिया नगरातील जनतेचा वतीने तेल्हारा नगर पालिकेला निवेदन देण्यात आले.
या वेळी गजानन खोडे, लखन वदोडे, बाळू गिरी, सुरेख सुलाखे, शिवकण्या बावस्कर, सरिता गिरी, आशा ढोरे, मनोज चोपडा, गणेश महोरे, उषा गोठखडे, महादेव पांडे, कैलास कुमार ,प्रशांत इंगळे,उ मा बांगडी, सरिता बन्सीवाल, सरिता बाबरवाल, रेखा कड, राजकन्या अरबत या निवेदनावर सर्व महिला व पुरुषांचा सह्या आहेत .
अधिक वाचा : घोडेगाव जवळ अपघातात एकाचा बळी, नागरिकांचा पोलीस प्रशासनाविरुद्ध रोष