तेल्हारा- तालुक्यातील हिवरखेड पोलीस स्टेशन हद्दीतील ग्राम बेलखेड येथे सकाळी एका भामट्याने येथील एका महिलेला सोने उजळून देतो या नावाखाली तब्बल दीड लाखाचे सोन्याचे दागिने घेऊन पसार झाला.
सर्वात जास्त दागिन्यांचा मोह जर कोणाला असेल तर तो महिला वर्गांना आपले दागिने कसे चकाकतील व सुंदर दिसतील असा त्यांचा पर्यन्त असतो.याच बाबतीतील प्रकार बेलखेड येथे घडला आज सकाळी एक भामटा गजानन महाराज मंदिराजवळ राहणाऱ्या एका महिलेला दागिने चमकवून देतो अशा प्रकारची बतावणी करून सदर महिलेने जवळपास दिड लाखाचे दागिने त्या इसमाजवळून दिले.गरम पाणी घेऊन या असे त्या भामट्याने महिलेला गरम पाणी आणण्यासाठी स्वयंपाक खोलीत गेली असता त्या भामट्याने दागिने घेऊन पोबारा केला.आपल्याला गंडा घातला असे लक्षात येताच एकच धांदल उडाली होती.या प्रकारावरून महिलांनी सतर्क राहणे आवश्यक आहे.