” एक दिवस शेतक-यांसोबत ” या उपक्रमाचे 30 जुन रोजी आयोजन
अकोला, दि. 12:- शेतक-यांच्या शेती विषयक तसेच शेती पिक कर्जा विषयक समस्या सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासनव्दारे प्रत्येक गावांत एक दिवस शेतक-यांसोबत या कार्यक्रमाचे आयोजन 30 जुन 2018 रोजी करण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी दिली.
आपले सरकार , कृषि सेवा केंद्र ,कोणत्या वाणांची पेरणी करणार , कोणते बियाणे वापरणार ,बियाणे सर्टिफाईड आहेत का, पिकांवर कोणतेही रोग येऊ शकतात , यासाठी उपाययोजना , पिकांवर फवारणी करतांना घ्यावयाची काळजी. याबाबतची माहिती तसेच परिवारातील सदस्य , लाभार्थी , कोणत्या योजनेचा लाभ मिळाला आहे.पिककर्ज मिळाले का , पिक विमा केला की कसे, पिक कर्ज घेतल्यास त्याची परतफेड कशी करणार तसेच शेतक-यांना असलेल्या विविध अडचणी समस्या याबाबतची माहिती एक दिवस शेतक-यांसोबत या उपक्रमामध्ये घेण्यात येणार आहे.
यासाठी ग्रामसेवक , कृषि सहायक ,कृषि सेवक, शिक्षक , अंगणवाडी सेविका, तसेच जिल्हा परिषद , पाटबंधारे , सार्वजनिक बांधकाम, जिल्हा प्रशासनातील तहसिलदार , नायब तहसिलदार तसेच अधिनस्त असलेले कर्मचारी , बँक कर्मचारी आदि प्रत्येक गावात जाऊन शेतक-यांना भेटणारआहे. आणि शेतक-यांच्या समस्या व अडिअडचणी जाणून घेणार आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी दिली.
या उपक्रमासाठी नोडल ऑफिसर म्हणून उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.