तेल्हारा(प्रतिनिधी)- गेल्या एक महिनापूर्वी चोरी गेलेल्या बैल व गायचे काय झाले तपास लागला का असे विचारण्यासाठी तेल्हारा पोलीस स्टेशन मध्ये गेलेल्या शेतकऱ्याला “आम्हाला एवढे एकच काम नाही अजून बरेच कामे आहेत”असे उत्तर मिळाले त्यामुळे आर्थिक विवंचनेत व परेशान झालेल्या या शेतकऱ्याने न्यायासाठी थेट पोलीस अधीक्षक यांचे कार्यालय गाठून तक्रार अर्ज दाखल केला व न्यायाची मागणी घातली.
तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये येणाऱ्या थार येथील शेतकरी सुधाकर फोकमारे यांची थार येथे दोन एकर शेती आहे.त्याच शेतीमध्ये त्यांचा गायवाडा असून त्यामध्ये आपली गुरे बांधत असत व तिथेच झोपित असत मात्र दि १० जुलै रोजी रात्री पाऊस आल्याने ते घरी झोपण्याकरिता गेले.सकाळी शेतीमध्ये आले असता गायवाड्याचे कुलूप तोडलेले व दोन बैल व गाय असे तीन गुरे चोरी गेल्याचे लक्षात आले.शोध घेतला मात्र दिसून न आल्याने तेल्हारा पोलीस गाठून या बाबत फिर्याद दाखल केली. फिर्याद दिल्या नंतर आम्ही गुरांचा शोध घेतो असे सांगितले.त्यानंतर बऱ्याच वेळा विचारणा केली मात्र अपेक्षित उत्तर मिळत नव्हते.स्वतः शोध घेऊन शोध लागत नसल्याने व आर्थिक विवनचनेत तसेच ज्यावर रोजीरोटी होती तेच चोरीला गेल्याने वारंवार तेल्हारा पोलीस स्टेशन मध्ये विचारणा करीत होते.दि २ ऑगस्ट रोजी चोरी गेलेल्या बैलांची विचारणा गेले असता त्यांना पोलिसांकडून आम्हाला एवढे एकच काम नाही अजून बरेच कामे आहेत असे सांगून परत पाठवले.
सदर शेतकऱ्याचा उदरनिर्वाह चोरी गेलेल्या बैलांवर होता कारण स्वतःच्या शेताची कामे व इतरांच्या शेतीचे कामे ते या बैल जोडीने करीत असत व गाईचे दूध त्यांच्या उपयोगी येत होते.मात्र आपल्या चोरी गेलेल्या गुरांची विचारणा करण्याकरिता गेले असता उडवा उडवीचे उत्तरे मिळत असल्याने अखेर न्यायासाठी थेट जिल्हा पोलिस अधीक्षक अकोला यांचे कार्यालय गाठून तक्रार वजा विनंती अर्ज सादर करून न्याय मागितला.त्यामुळे आता या प्रकरणी जिल्हा पोलिस अधीक्षक कुठले पाउल उचलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – www.twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola