तेल्हारा(प्रतिनिधी)- अकोला जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने आज दुपारी तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये येणाऱ्या आडसुळ येथे वरली मटका अड्डयांवर धाड टाकली असता यामध्ये नऊ आरोपी सह दहा हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या विशेष पथकाचे प्रमुख हर्षल अलसपुरे हे एक खमक्या पोलीस अधिकारी म्हणून संपूर्ण जिल्ह्यात परिचित असून त्यांच्या धडक कारवाईचा सर्वांना चांगलाच परिचय असून आज त्यांच्या पथकाने ग्राम आडसुळ येथे वरली मटका जोमात सुरू असल्याची माहिती मिळाली होती त्यावरून दोन ठिकाणी छापा टाकला असता सात आरोपींना अटक करण्यात आली.तर दोन आरोपी फरार झाल्याची माहिती देण्यात आली.यामध्ये आरोपी १)जयदेव महादेव वानखडे ,२)उमेश महादेव मोहळ ,३)प्रवीण अंबादास अरबट ,४)नाजूकराव बिल्लेवार ,५)विठ्ठल अमझरे, तर याच गावामध्ये दुसऱ्या ठिकाणी छापा टाकला असता त्यामध्ये आरोपी १)विवेकानंद ज्ञानदेव नवलकार ,२)विनोद जनार्धन तायडे ,तसेच यामध्ये दोन आरोपी फरार झाले या आरोपीं विरुध्द तेल्हारा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.असून अलसपुरे यांच्या पथकाच्या छाप्या मुळे अवैध धंद्या वाल्याचे धाबे दणाणले आहे.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – www.twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola