मुंबई : सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी लवकरात लवकर करण्यात यावी या मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचारी उद्यापासून तीन दिवसांच्या संपावर जाणार आहेत.या संपात सुमारे १७ लाख सरकारी कर्मचारी सहभागी होणार असल्याने कामकाज ठप्प होण्याची शक्यता आहे.
सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी १७ लाख राज्य सरकारी कर्मचारी उद्यापासून तीन दिवसांच्या संपावर जाणार आहेत. उद्यापासून सुरू होणा-या या संपात मंत्रालय, जिल्हा परिषद, नगरपालिका, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सहभागी होणार आहेत. सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबत सरकारने आमची फसवणूक केली असल्याने आम्हाला संपाचे हत्यार उपसावे लागले असल्याची प्रतिक्रिया समन्वय कृती समितीचे अध्यक्ष विश्वास काटकर आणि निमंत्रक गजानन शेटे यांनी दिली.७२ हजार पदांची मेगा भरती रद्द करण्यात आल्याची घोषणा काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात पदे रिकामी असल्याने कर्मचाऱ्यांवर ताण पडत असल्याने या जागा तात्काळ भरल्या जाव्यात अशी मागणी ही त्यांनी केली.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – www.twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola