मुंबई : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी राज्यात सुरू असलेल्या सकल मराठा मोर्चाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपच्या विरोधात वातावरण असतानाही सांगली, मिरज, कुपवाड आणि जळगाव मध्ये भाजपला घवघवीत यश मिळाल्याचे चित्र आहे. सांगली, मिरज, कुपवाड मध्ये ४१ तर जळगाव मध्ये ५७ जागा मिळवित भाजपने स्पष्ट बहुमत मिळविले आहे.
मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर सांगली, मिरज, कुपवाड आणि जळगाव महानगरपालिकेच्या झालेल्या निवडणूकीत भाजपचा वारू रोखला जाईल असा होरा विरोधकांचा होता. मात्र या दोन्ही ठिकाणी पहिल्या दिवसापासूनच भाजपने विकासाचा मुद्दा केंद्रित करून प्रचारावर भर दिला होता. तर पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, मिरज, कुपवाड हा राष्ट्रवादी आणि कॅांग्रेसचा बालेकिल्ला असतानाही भाजपने या ठिकाणी आघाडीला खिंडार पाडत जोरदार मुसंडी मारली आहे. ७८ पैकी ४१ जागांवर विजय मिळवत भाजपने बहुमताचा आकडा पार करत दिग्गजांचे अंदाज धुळीस मिळविले आहेत.यापूर्वी केवळ २ जागा असलेल्या या महानगरपालिकेत ४१ जागा जिंकत भाजपने सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेवर झेंडा फडकावला आहे.
राजकीय तज्ज्ञांसह सांगलीतील दिग्गज नेत्यांचे अंदाज धुळीस मिळवित भाजपने सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेत भाजपने सत्ता काबीज केली आहे. या महानगरपालिकेतील ७८ पैकी ४१ जागा जिंकत भाजपने बहुमत मिळविले आहे. या ठिकाणी कॅांग्रेसला २० तर राष्ट्रवादीला १५ जागा मिळाल्या आहेत. सध्या राज्यात सुरू असलेल्या मराठा समाजाच्या आंदोलनामुळे सांगलीत भाजपाचे पानिपत होईल अशी चर्चा होती मात्र ही अपेक्षा धुळीस मिळवित भाजपने सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेवर झेंडा फडकावला आहे. खा. राजू शेट्टी यांच्या स्वाभीमानी विकास आघाडीला आणि अपक्षांना प्रत्येकी एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. सत्ताधारी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला धक्कादायकरित्या पराभवाचा सामना करावा लागल्याने या दोन्ही पक्षांच्या नेत्यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. या आश्चर्यकारक निकालानंतर शहरांमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला.
या निवडणूकीत सांगली जिल्ह्यातील अनेक दिग्गज नेत्यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली होती.मराठा मोर्चाच्या आंदोलनामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रचार सभांना उपस्थिती लावता आली नसल्याने स्थानिक नेत्यांवरच प्रचाराची संपूर्ण जबाबदारी होती. ही निवडणूक राष्ट्रवादी कॅांग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे आ. विश्वजित कदम, माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांची तर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील,सहकारमंत्री सुभाष देशमुख,खासदार संजय पाटील आ.सुधीर गाडगीळ, आ.सुरेश खाडे यांच्यासाठी प्रतिष्ठेची मानली गेली होती. आज मतमोजणीच्या सुरूवातीलाच आघाडीने भाजपला पिछाडीवर टाकल्याचे चित्र होते.मात्र आघाडीला नंतरच्या टप्प्यात भाजपने चारीमुंड्या चित केल्याचे चित्र पहायला मिळाले. ७८ जागांसाठी एकूण ४५१ उमेदवार या निवडणूकीत आपले भविष्य अजमावित होते. त्यापैकी भाजपला ४१, काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला ३५, स्वाभिमानी विकास आघाडीला १, तर अपक्ष १ जागा मिळाल्या आहेत. गेल्या महानगरपालिकेत भाजपला केवळ ६ जिंकत्या आल्या होत्या मात्र या निवडणूकीत भाजपने महानगरपालिकेचा गड जिंकत सहा थेट ४१ जागांपर्यंत मजल मारली आहे.
जळगावात सुरेश जैन यांना हादरा ; भाजपला बहुमत
जळगाव महानगरपालिकेत माजी मंत्री सुरेश जैन यांच्या ३५ वर्षाच्या सत्तेला भाजपाने सुरूंग लावला आहे.जळगाव महानगरपालिकेच्या निवडणूकीत ५७ जागा जिंकत भाजपाने बहुमत मिळविले आहे.शिवसेनेला १३ जागा मिळाल्या आहेत तर आघाडीला भोपळाही फोडता आला नाही. राज्यात सुरू असलेल्या सकल मराठा समाजाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या निवडणूकीत येथिल जनतेने विकासाला महत्व दिल्याचे स्पष्ट झाले आहे.
जळगाव महानगरपालिकेच्या एकूण ७५ जागांसाठी झालेल्या निवडणूकीत एकूण ३०३ उमेदवार उभे होते. या निवडणूकीची मतमोजणी आज झाली.सुरूवाती पासून भाजपने आघाडी घेत ५७ जागा जिंकत या महानगरपालिकेत बहुमत प्राप्त केले आहे. शिवसेनेला १३ जागांवरच समाधान मानावे लागले तर एमआयएमला ३ तर अपक्षांनी २ जागा जिंकल्या आहेत.या निवडणूकीत माजी मंत्री सुरेश जैन यांच्या नेतृत्वाला गेल्या ३५ वर्षात मतदारांनी प्रथमच मोठा हादरा दिला आहे.या ठिकाणी विकासाचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी विकासाचे आश्वासन दिले होते त्याला येथिल जनतेला कौल दिल्याचे सप्ष्ट होते.
अधिक वाचा : ग्राहकाकडून दुकानदाराने 10 रुपयांचे नाणे स्वीकारण्यास दिला नकार, कोर्टाने सुनावली शिक्षा
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola