पुणे – मराठा आरक्षणासाठी आंदोलकांनी चाकणमध्ये हिंसक मार्ग स्वीकारल्याचे चित्र आहे. कारण आरक्षणासाठी काढलेल्या मोर्चा दरम्यान आंदोलकांनी संतप्त होऊन २५-३० बसेस जाळल्या आहेत. त्यामुळे चाकण पोलिसांनी जमावबंदी सुरु केली आहे.
चाकणमधील मोर्च्यात आक्रमक मोर्चेकऱ्यांनी पुणे-नाशिक महामार्ग रोखून तर धरलाच, शिवाय समोर येणाऱ्या प्रत्येक बसेवर तुफान दगडफेक करत अनेक बसेसची जाळपोळ केली. दरम्यान आंदोलकांना नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना आंदोलकांवर अश्रुधुराचा मारा केला. सध्या चाकणमध्ये प्रचंड तणावाचे वातावरण झालं आहे असं वृत्त आहे.
काही वेळाने आक्रमक आंदोलकांनी २५-३० बसेस जळताच लोकांमध्ये खूप धावपळ झाली आणि त्यानंतर आक्रमक झालेल्या या जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी जोरदार लाठीमारही केला. सरकार आता यापुढे कोणती भूमिका घेते ते पाहावं लागणार आहे.