अकोट(सारंग कराळे)-जननी २ च्या यशस्वी आयोजन दिनांक १२ ते २२ जुलै दरम्यान संपूर्ण अकोट शहरात करण्यात आले होते, परंतु जननी २ मोहीम ही वर्ष भर राबविण्याचा ध्यास पोलिस निरीक्षक गजानन शेळके ह्यांचा असल्याने त्या साठी महिला व बालक सौरक्षण व जेष्ठ नागरिक सौरक्षण पथके स्थापन करण्यात आली असून ह्या पथकांच्या माध्यमातून महिला सबलीकरण व सुरक्षा तसेच जेष्ठ नागरिक सुरक्षा ह्या प्रमुख गोष्टीवर भर देण्यात येणार आहे, जननी2 च्या माध्यमातून प्रत्येक शाळा ,महाविद्यालयाच्या मुली पर्यंत व इतर कार्यक्रमाच्या व मोहल्ला मीटिंग च्या माध्यमातून जनजागृती केल्या नंतर सांगितल्या प्रमाणे सेवा मिळावी म्हणून वेगळी पथके स्थापन करण्यात आली आहे, महिला व बालक सौरक्षण पथकात PSI गवई, पोलिस कर्मचारी संजय घायल, सुरज चिंचोळकर, महिला पोलिस पूजा वानखेडे ह्यांचे पथक स्थापन करण्यात आले असून जेष्ठ नागरिक सुरक्षा पथकात पोलिस उपनिरीक्षक आशिष शिंदे, साहाय्यक पोलिस उपनिरीक्षक रणजित खेडकर, विलास मिसाळ, उमेश सोळंके ह्यांचे पथक स्थापन करण्यात आले असून सदर पथके पोलिस निरीक्षक गजानन शेळके ह्यांचे मार्गदर्शनात कार्यरत राहणार आहेत, वेळोवेळी अकोट शहरात मुली आणि महिलांसाठी जनजागृती करणे, शाळा महाविद्यालय ह्यांना भेटी देऊन मार्गदर्शन करणे, लावलेल्या तक्रार पेट्या मधील तक्रारींची नोंद घेऊन निपटारा करणे इत्यादी कामे महिला व बालक सौरक्षण पथक करणार असून जेष्ठ नागरिक सुरक्षा पथक, गरजू जेष्ठांची मदत करणे, त्यांच्या तक्रारींचे निरसन करणे, महिन्यातून एकदा जेष्ठांची मीटिंग घेऊन मार्गदर्शन करणे ,शहरात राहणाऱ्या एकट्या जेष्ठांच्या संपर्कात राहून गरजे प्रमाणे त्यांना मदत करणे इत्यादी कामे करणार आहेत, समाजातील महिला व जेष्ठांची सर्वोतोपरी मदत करून जननी मोहीम वर्षभर सुरूच ठेवणार असल्याचे पोलिस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी सांगितले।
हेही वाचा : अकोट मध्ये बंद न ठेवता सकल मराठा समाजाने काढला भव्य कँडल मार्च