अकोला: मराठा अारक्षणासह इतरही मागण्यांसाठी सकल मराठा समाजातर्फे बुधवार, २५ जुलै राेजी अकाेला बंदची हाक देण्यात अाली अाहे. बंदचा निर्णय मंगळवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर सुरु असलेल्या ठिय्या अांदाेलन मंडपातील बैठकीत घेण्यात अाला. बंदमध्ये शाळा, महाविद्यालयांचाही समावेश राहणार अाहे. मात्र अांदाेलनातून अत्यावश्यक सेवांना वगळण्यात अाले अाहे. तत्पूर्वी आरक्षणाच्या मागणीसाठी औरंगाबादमध्ये आंदोलक तरुणाने गोदावरी नदीत उडी घेऊन जलसर्मपण केल्याने मराठा समाजाकडून रस्त्यावर मंडपासमाेरच त्या युवकाला श्रद्धांजली अर्पण करण्यात अाली.
मराठा समाजाला अारक्षण लागू झाल्यानंतरच नाेकर भरती करावी, मराठा समाजातील विद्यार्थ्यांना प्रवेश घेताना शैक्षणिक शुल्कात ५० टक्के सवलत न देणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई करण्यात यावी, अण्णासाहेब पाटील अार्थिक विकास महामंडळाकडे दाखल करण्यात अालेली सर्व कर्ज प्रकरणं मंजूर करावीत, स्वामी नाथन अायाेग लागू करण्यात यावा यासह इतरही मागण्यांसाठी सकल मराठा समाजातर्फे सोमवारपासून ठिय्या अांदाेलन सुरु अाहे.
अशा घडल्या घडामोडी
१) सकल मराठा समाजातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर उभारण्यात अालेल्या अांदाेलन मंडपात मंगळवारी सकाळपासूनच गर्दी वाढत गेली.
२) दुपारी १२ वाजताच्या सुमारास मराठा समाज बांधवांनी अापल्या भावना व्यक्त करण्यास सुरुवात केली.
३) अांदाेलनादरम्यान औरंगाबादमध्ये गोदावरी नदीत उडी घेऊन जलसर्मपण केलेल्या काकासाहेब शिंदे या युवकाचा मृत्यू झाल्याने श्रद्धांजली अर्पण करण्यात अाली. मंडपासमाेरच असलेल्या रस्त्यावर मराठा बांधव दाेन मिनिटं स्तब्ध उभे राहिले. त्यामुळे काही वेळासाठी वाहतूक बंद करण्यात अाली हाेती.
अशी झाली अांदाेलक- पोलिसांमध्ये चर्चा
श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर आंदोलकांनी बंद पुकारण्यात येत असल्याचे तेथे उपस्थित असलेले शहर पोलिस उपअधीक्षक उमेश माने यांना सांगितले. मात्र पोलिसांनी वेट अॅड वाॅचची भूमिका स्वीकारली. बंदसाठी अाम्ही बळजबरी करणार नसून, विनंतीच करण्यात येईल, असे अांदाेलक म्हणाले. दगडफेक अथवा अनुचित घटना घडल्यास अाम्ही जबाबदार राहू, अशीही ग्वाही एका अांदाेलकाने दिली. यावर पोलिसांनी अाम्हाला बंदोबस्ताच्या िनयाेजनासाठी वेळ हवा, अशी भूमिका मांडली. त्यामुळे अांदाेलकांनी पुन्हा मंडपाकडे माेर्चा वळवला.
काय अाहे पत्रात…
अकाेला बंद बाबत सकल मराठा समाजातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देण्यात अाले २५ जुलै राेजी पुकारण्यात येणाऱ्या बंदमध्ये जिल्हयातील व्यापारी संकुले, शाळे, महाविद्यालये, प्रतिष्ठाने बंद करणार अाहे. बंदमध्ये वाहतुकीला अडथळा निर्माण हाेणार नाही, याची खबरदारी घेणार असून, अत्यावश्यक सेवाही वगळणार अाहे, असेही पत्रात स्पष्ट करण्यात अाले अाहे.
अारक्षणासह इतरही मागण्यांसाठी जल समर्पण केलेल्या युवकाला सकल मराठा समाजातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर श्रद्धांजली अर्पण केली. (दुसऱ्या छायाचित्रात) सकल मराठा समाजातर्फे या ठिकाणी समाजातील मंत्री, खासदार, आमदारांना आंदोलनात सहभागी न होण्याचे आवाहन केलेला फलक लावला होता.
असा झाला निर्णय जाहीर
अकाेला बंद पुकारण्याबाबत अांदाेलकांनी बैठकीत चर्चा केली. अगदी अाताच बंद पुकारण्यापेक्षा सर्वांनाच वेळ देऊन बंद पुकारल्यास साेयीचे हाेईल, असा सूर उमटला. याबाबत रीतसर प्रशासनाला माहिती देऊन बंद पुकारणे याेग्य हाेईल, असेही काही अांदाेलक म्हणाले. बंदची माहिती संबंधित संघटना आणि समाजबांधवांना मिळाल्यास तेही अांदाेलनात सहभागी हाेऊ शकतील, असाही प्रस्ताव एकाने मांडला. त्यामुळे सर्वानुमते बुधवारी बंद पुकारण्याचा निर्णय जाहीर करण्यात अाला. याप्रसंगी पोलिसही उपस्थित हाेते.
पोलिसांचा तगडा बंदोबस्त
सकल मराठा समाजातर्फे सोमवारी केलेल्या अांदाेलनादरम्यान काही युवकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेतल्याने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात तगडा बंदोबस्त तैनात केला हाेता. मुख्य द्वारावर तर पोलिस अधिकारी, अारसीबीचे जवानही तैनात केले हाेते. ‘बंद’ची चर्चा सुरु झाल्यानंतर पोलिसांची जादा कुमक बोलावण्यात अाली. यात महिला पोलिसांचाही समावेश हाेता. या वेळी काेतवालीचे ठाणेदार विलास पाटील, ‘खदान’चे ठाणेदार संताेष महल्ले यांच्यासह ६५ पेक्षा जास्त अधिकारी-कर्मचारी तैनात हाेते.
सरकारप्रती व्यक्त केला राेष
ठिया अांदाेलन मंडपात अांदाेलकांनी मंगळवारी सरकारप्रती राेष व्यक्त केला. अारक्षणासह इतरही मागण्यासाठी बलिदानाची वेळ अालीे. मात्र हे बलिदान व्यर्थ जाणार नाही, असे अांदाेलक म्हणाले. अारक्षणासाठी सरकार न्यायालयासह इतरही यंत्रणांकडे पाठपुराव्यात कमी पडत अाहे. हे अांदाेलन जात-धर्मािवरुद्ध नसून, काही जण तेढ निर्माण करीत अाहे, असा अाराेप अांदाेलकांनी केला. राज्यात मराठ्यांचे लाखाेंच्या गर्दीचे ५८ माेर्चे शांततेत निघाले. सरकारने संयमाचा अंत पाहू नये; अन्यथा त्यांना पळता भुई थाेडी हाेईल, असाही इशाराही त्यांनी दिला.