बोरगाव मंजू : सकल मराठा समाजाच्या वतीने राष्ट्रीय महामार्गावर बस थांब्यावर कार्यकर्त्यांनी बुधवारी सकाळी साडे दहा वाजता रस्त्यावर आंदोलन छेडले. यामुळे महामार्गावरील वाहतूक प्रभावित झाली होती. तर शहरातील शाळा, महाविद्यालयातुन विद्यार्थी आपल्या घरी शाळेतुन परत गेल्याचे चित्र दिसून आले. अंदोलकांनी एक मराठा- लाख मराठा, काकासाहेब शिंदे अमर रहे, तुमचे बलिदान व्यर्थ जाणार नाही , अशा घोषणा दिल्या. सकाळी शाळा, महाविद्यालये उघडण्यात आली होती; परंतु दहा वाजता नंतर विद्यार्थ्यांची घरी जाण्यासाठी लगबग दिसुन आली. तर बस थांब्यावरील हॉटेल दुकाने बंद होती. आंदोलनात अजय देशमुख, गजानन देशमुख, योगेश बोधडे, धिरज देशमुख , संजय देशमुख, संजय पगारे, सोपान सारसे, चेतन राऊत, श्रीकांत देशमुख, महेश देशमुख, प्रशांत राऊत, याच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते. तर ठाणेदार विजय मगर पोलीस उपनिरीक्षक युवराज उईके , अरुण मदनकर, प्रवीण वाकोडे, पोलीसांनी अंदोलकांना शांत करून वाहतूक व्यवस्था सुरळीत केली. दरम्यान, पोलीसांनी शांततेचे आवाहन करून चोख बंदोबस्त तैनात ठेवला होता