तेल्हारा दि.२४ –खरिप २०१७-१८ चा विमा शेतक-यांना वितरित करण्यात आला परंतु बेलखेड येथील काही शेतक-यांनी नॅशनल इन्शुरन्स कंपनी कडून ऑन लाईन विमा काढला होता परंतु शेतक-यांना ऑन लाईन विमा न देता उलट ऑफलाईन विमा इतर शेतक-यांच्या जमा करण्यात आला व ऑन लाईन विमा काढणारे शेतकरी या पासुन वंचित राहीले या कंपनीची चौकशी लावून लवकर शेतक-यांना त्यांचा विमा ची रककम द्यावी अशी मागणी शेतकरी संघटना चे बेलखेड प्रमुख दादाभाऊ टोहरे यांनी पालकमंत्री ना.डॉ.रणजित पाटील व जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडे यांना जनता दरबारमध्ये केली, तसेच १९ जून ला बेलखेड येथे झालेल्या वादळी पावसामुळे पिकाचे आणि इतर नुकसान झाले होते, यावर सुद्धा विचार करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. या वेळी शेतकरी संघटनाचे बेलखेड प्रमुख दादाभाऊ टोहरे यांचे सोबत गोपाल उंबरकार, नितीन उंबरकार, श्रीधर टोहरे, रत्नप्रभा टोहरे, नंदकिशोर उंबरकार, अरुण राऊत, लता उंबरकार, शांताबाई टोहरे, बंडुभाऊ नागपुरे, नितीन टाहरे, इतर शेतकरी वर्ग व कार्यकर्ते उपस्थित होते.
हेही वाचा : भाजपा युवा मोर्चाच्या आंदोलनाला यश,न प कडून शहरातील अंतर्गत रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात