तेल्हारा(शुभम सोनटक्के)- तेल्हारा शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत पणे कोचिंग कलासेस चालवून गोर गरीब विद्यार्थ्यांकडून अवाच्या सवा फी घेऊन त्यांची लूट करीत असून लाखो रुपयांची माया या कोचिंग कलासेस संचालकांनी जमवली असून अशा अनधिकृत कलासेस वर कारवाई करावी याबाबतचे निवेदन तहसीलदार तेल्हारा यांना भाजयुमो तर्फे आज देऊन मागणी करण्यात आली.
शिक्षण विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे तेल्हारा शहरात अवेध शिकवणी वर्ग फोफावले असून शिकवणी वर्गाच्या संचालकांनी मोठी माया जमवली असून वेगवेगळ्या प्रकारचे आमिष दाखवून व शिकवणी वर्ग लावला नाही तर शैक्षणिक नुकसान होईल अशी भीती दाखवण्यात येते त्यामुळे विद्यार्थ्यांना नाईलाज वर्ग लावावा लागतो.शिक्षण विभागात या शिकवणी वर्गाची कुठलीच नोंद नसतांना सुद्धा कुठलीच कारवाई होत नाही अथवा आज पर्यंत झाली नाही त्यामुळे यामध्ये संचालक व शिक्षण विभागाचे साटेलोटे तर नाही ना असा नागरिकांना प्रश्न पडला आहे.तसेच शिकवणी वर्गाची नोंद नसल्याने लाखो रुपयांची माया जमवून सुद्धा कुठला ही कर न भरता बुडवीत असतांना व शिकवणी वर्गावर विद्यार्थ्यांना कुठलीच सुविधा उपलब्ध नाही अशात प्रशासनाने याबाबतची चॉकशी करून सदर कोचिंग कलासेस वर कारवाई करावी व पालकांना पडणारा भुदंड थांबवावा अशी मागणी आज तेल्हारा तहसीलदार यांना भाजयुमो तेल्हारा तालुका तर्फे करण्यात आली.यावेळीभाजयुमो जिल्हा सरचिटणीस लखन राजनकार, भाजयुमो तालुका अध्यक्ष सतीश जयस्वाल, शहर अध्यक्ष अक्षय पदवाड,राहुल झापर्डे,दीपक अहेरकर,सागर नेरकर, विशाल तींवर,मनीष डामरे,सौरभ विखे,गणेश रत्नपारखी,गणेश इंगोले इत्यादी भाजयुमो चे कार्यकर्ते उपस्थित होते.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola