अकोट(सारंग कराळे)-पोलिस स्टेशन अकोट शहर तर्फे अकोट शहरामध्ये जननी 2 मोहीम जोरात सुरू असून काल एकाच दिवशी 3 कार्यक्रम घेतल्या नंतर आज पण पोलिस निरीक्षक गजानन शेळके ह्यांचे मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलिस निरीक्षक शुभांगी दिवेकर व सुरज निंबाळकर ह्यांनी सरस्वती विद्यालय व नरसिंग विद्यालय येथे जननी2 अंतर्गत कार्यक्रम घेऊन शेकडो च्या संख्येने जमलेल्या विद्यार्थिनींनामहिला विषयक विविध कायदे, छेडछाड पासून कसे सौरक्षण करावे, चांगला आणि वाईट स्पर्श इत्यादी बाबत मार्गदर्शन केले.
शहरातील प्रत्येक शाळा कॉलेज मध्ये जाऊन जननी पथक मार्गदर्शन करणार आहे, त्याच प्रमाने शहरातील महिलांना विविध कायद्यांची माहिती व्हावी म्हणून शहरातील प्रमुख चौकात महिला,मुली व जेष्ठ नागरिकांना माहिती व्हावी ह्या उद्देशाने विविध कायद्याची माहिती अंतर्भूत असलेले पोस्टर व भित्ती पत्रके लावण्यात आले, जननी2 मोहीम अकोट शहरात प्रभावी पणे राबविण्यात येणार असल्याचे पोलिस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी सांगितले