• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, February 1, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला अकोला शहर

पीककर्जासाठी शेतकऱ्याच्या पत्नीला शरीरसुखाची मागणी करणाऱ्या सेन्ट्रल बँक अधिकाऱ्याला अटक

City Reporter by City Reporter
May 22, 2020
in अकोला शहर
Reading Time: 1 min read
78 1
0
राजेश हिवसे
11
SHARES
561
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला(प्रतिनिधी)-पीककर्जासाठी शेतकऱ्याच्या पत्नीला शरीरसुखाची मागणी करणारा दाताळा येथील सेंट्रल बँकेचा शाखाधिकारी राजेश हिवसे याला अटक करण्यात आली आहे. महिलने दिलेल्या फिर्यादीवरुन बँक मॅनेजरवर गुन्हा दाखल करण्यात आला होता, तेव्हापासून तो फरार होता. अखेर सोमवारी रात्री मलकापूर पोलिसांनी हिवसे याला नागपुरातून ताब्यात घेतले. उद्या (मंगळवारी) त्याला मलकापूर न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मलकापूर तालुक्यात उमाळी येथील शेतकरी गुरुवारी १४ जून रोजी सकाळी दाताळा येथील सेंट्रल बँकेत त्यांच्याकडे असलेल्या दोन एकर शेतीवर पिककर्ज मागणीसाठी पती-पत्नीसह गेले. सर्व कागदपत्रे जमा करून बँक मॅनेजरला पिककर्ज केव्हा मिळेल याबाबत विचारणा केली. बँक मॅनेजरने मोबाईल नंबर घेत मी कर्ज मंजुरीबाबत मोबाईलवर कळवितो असे सांगितले. मोबाईल नंबर घेतल्यानंतर मॅनेजर राजेश हिवसे याने व त्याला सहकार्य करणार्‍या शिपाई मनोज चव्हाण याने ‘त्या’ शेतकर्‍याच्या पत्नीला मोबाईलवर फोन करून ”तुम्ही माझ्या मलकापूर येथील रुमवर या, तुमच्या हातचा चहा प्यायला खूप आवडेल, तुम्ही खूप सुंदर आहात” असे म्हणून अश्लील संभाषण करीत शरीरसुखाची मागणी केली. तर मनोज चव्हाण यानेही ”साहेब तुम्हाला पॅकेज देतील, तुम्ही साहेबांना खुश करा, साहेब तुम्हाला खुश करतील, मी तुम्हाला साहेबांच्या रुमवर घेऊन जातो” असे म्हणाला.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

साहेबांच्या सांगण्यानुसार त्याने या दाम्पत्याचा घरापर्यंत त्यांचा पाठलाग केला. गेल्या आठ दिवसातील या सर्व फोन कॉल्सची रेकॉर्डिंग पीडित महिलेने मोबाईलमध्ये करून ठेवली होती. ती सर्व रेकॉर्डिंग ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक गावंडे यांना देऊन सदर बँक मॅनेजर व शिपायाची तक्रार दिली. या फिर्यादीवरून सेंट्रल बँकेचे मॅनेजर राजेश हिवसे व शिपाई मनोज चव्हाण या दोघांविरुद्ध कलम ३५४ (अ) (११) अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कलमानुसार काल गुरुवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला होता.

Previous Post

तेल्हारा शहरात प्लास्टिक बंदीची पहिले विकेट,फळ विक्रेत्याला बसला दंड

Next Post

खूशखबर! करा ही गोष्ट, पंतप्रधान मोदी देणार 25 हजार

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात
Featured

तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात

November 8, 2025
Next Post
मोदी

खूशखबर! करा ही गोष्ट, पंतप्रधान मोदी देणार 25 हजार

चिकन खाताय,सावधान!

चिकन खाताय,सावधान!, कोंबड्यांना अवैधरित्या दिली जातात इंजेक्शन!

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.