तेल्हारा (शुभम सोनटक्के)- जागतिक योग दिनाचे औचित्य साधून आज लोकजागर मंच तेल्हारा च्या वतीने स्थानिक श्री शिवाजी हायस्कूल येथे चिमुकल्यांना योग प्रशिक्षण देण्यात आले.पहाटे ७ वाजताच्या दरम्यान योग प्रशिक्षनाला तेल्हारा शहरातील तसेच शहरालगतच्या गावातील चिमुकल्यांनि सहभाग घेऊन योग दिवस साजरा केला.यावेळी श्री शिवाजी हायस्कूल चे शारीरिक शिक्षक सावरकर यांनी या चिमुकल्यांना योगाचे धडे दिले.यावेळी लोकजागर मंच चे तालुका अध्यक्ष गोपाल जलमकार,श्री शिवाजी हायस्कुल चे सावरकर सर , लोकजागर मंच च्या इंग्लिस पिंकीग च्या अंकिता वर्मा मॅडम, नरेश भारसाकळे, व लोकजागर मंच ने सुरु केलेल्या इंग्लिस पिकींगचे सर्व विद्यार्थी व विद्यार्थीनी हजर होते सर्व मिळुन योग दिवस साजरा करण्यात आला असे लोकजागर मंच चे प्र.प्रमुख निलेश जवकार यानी सांगीतले आहे.
वाचा – विश्व योग दिन: योगा करण्यापूर्वी या 10 गोष्टींकडे द्या लक्ष, अन्यथा होऊ शकते नुकसान