तेल्हारा(प्रतिनिधी) :- नववर्षाच्या पूर्वसंध्येला बुधवार दि ३१ डिसेंबर २०२५ रोजी अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पोलीस स्टेशनचे वार्षिक निरीक्षण करण्यात आले. तेल्हारा पोलीस स्टेशनच्या वार्षिक निरीक्षणा-अंतर्गत बुधवारी ३१ डिसेंबर रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक अर्जित चांडक यांचे पो.स्टे. च्या आवारात आगमन होताच परेड वंदना पार पडली. यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांचे गणवेश परीक्षणही करण्यात आले. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी तेल्हारा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावातील पोलीस पाटील बंधू भगिनींची सभा घेतली. या सभेत मार्गदर्शक सूचना व मार्गदर्शन करण्यात आले. पोलीस स्टेशन परिसर व इमारत पाहणी व आढावा घेण्यात आला. गुन्हे तपास आढावा, रेकॉर्ड तपासणी आणि आढावा घेण्यात येऊन एसएलआर, कार्बाइन, बोरगन, अश्रूदूतगन इत्यादी शस्त्रास्त्रांची पाहणी यावेळी करण्यात आली.
तेल्हारा पोलीस स्टेशन समोरील प्रांगणात आकर्षक सजावट व सुशोभीकरण करण्यात आले होते. दुपारी ४ वाजता पार पडलेल्या पोलीस दरबारात जिल्हा पोलीस अधीक्षकांनी पोलीस कर्मचाऱ्यांच्या समस्या व प्रश्न जाणून घेतले व पोलीस बांधवांना मार्गदर्शक सूचना व मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षकांसमवेत सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा आकोटचे उपविभागीय पोलीस अधिकारी निखिल पाटील, श्रीमती आनंद याप्रसंगी उपस्थित होत्या. तेल्हारा पोलीस निरीक्षक प्रकाश तूनकलवार, पोलीस उपनिरीक्षक निलेश ठाकरे, भटकर, सुलताने यांची यावेळी उपस्थिती होती. नववर्षाच्या पूर्वसंध्येला बुधवार दि ३१ डिसेंबर २०२५ रोजी अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पोलीस स्टेशनचे वार्षिक निरीक्षण करण्यातआले. तेल्हारा पोलीस स्टेशनच्या वार्षिक निरीक्षणाअंतर्गत बुधवारी ३१ डिसेंबर रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक अर्जित चांडक यांचे पो.स्टे. च्या आवारात आगमन होताच परेड वंदना पार पडली.
यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांचे गणवेश परीक्षणही करण्यात आले. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी तेल्हारा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावातील पोलीस पाटील बंधू भगिनींची सभा घेतली. या सभेत मार्गदर्शक सूचना व मार्गदर्शन करण्यात आले. पोलीस स्टेशन परिसर व इमारत पाहणी व आढावा घेण्यात आला. गुन्हे तपास आढावा, रेकॉर्ड तपासणी आणि आढावा घेण्यात येऊन एसएलआर, कार्बाइन, बोरगन, अश्रूदूतगन इत्यादी शस्त्रास्त्रांची पाहणी यावेळी करण्यात आली. तेल्हारा पोलीस स्टेशन समोरील प्रांगणात आकर्षक सजावट व सुशोभीकरण करण्यात आले होते. दुपारी ४ वाजता पार पडलेल्या पोलीस दरबारात जिल्हा पोलीस अधीक्षकांनी पोलीस कर्मचाऱ्यांच्या समस्या व प्रश्न जाणून घेतले व पोलीस बांधवांना मार्गदर्शक सूचना व मार्गदर्शन केले.
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षकांसमवेत सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा आकोटचे उपविभागीय पोलीस अधिकारी निखिल पाटील, श्रीमती आनंद याप्रसंगी उपस्थित होत्या. तेल्हारा पोलीस निरीक्षक प्रकाश तूनकलवार, पोलीस उपनिरीक्षक निलेश ठाकरे, भटकर, सुलताने यांची यावेळी उपस्थिती होती.










