अकोला (प्रतिनिधी) :- नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला जिल्ह्यात. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या आदेशान्वये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, तसेच नविन वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी नागरिकांना सुरक्षित आणी शांततामय वातावरण मिळावे याकरीता नाकाबंदी कोम्बींग ऑपरेशन मध्ये जिल्हयातील सर्व ठाणे प्रभारी अधिकारी व दुय्यम अधिकारी असे एकुण ७० अधिकारी व ३६१ अंमलदार यांनी सहभाग घेवुन खालील प्रमाणे प्रभावी कारवाई करण्यात आली.
नाकाबंदी/कोम्बींग ऑपरेशन दरम्यान पोलिस विभागाच्या वतीने दिनांक ३१.१२.२०२५ चे १९.०० वा ते दिनांक ०१.०१.२०२६ चे ०५.०० पावेतो बेरेकेटींग करून जिल्हयात २०२२ वाहने चेक करून मोटार वाहन कायदयान्वये ३७७ बेशिस्त वाहनांवर कारवाई करून १,९८,९००/-रू चा दंड आकरण्यात आला आहे. तसेच ५१ समन्स, ११ जमानती वॉरंट, ०५ पकड वॉरंट तामील करण्यात आले. जिल्हयातील ३६ अभिलेखावरील निगराणी बदमाश व माहितीगार गुन्हेगार यांना चेक करण्यात आले व कलम १२२ मपोका प्रमाणे २ कारवाई, भारतीय हत्यार कायदयान्वये ०३ केस करून ०३ घातक शस्त्रे जप्त करण्यात आले. तर कलम ११०,११७ प्रमाणे ३५ केसेस करून जिल्हयातील २० हॉटेल, लॉजेस व २१ एटीएम चेक करण्यात आले. महाराष्ट्र दारू बंदी कायदयान्वये जिल्हयात ०१ केस व महाराष्ट्र जुगार अधिनियम अन्वये ०२ केसेस करण्यात येवुन ड्रंक अँड ड्राईव्ह च्या संपूर्ण जिल्हयात ४१ केसेस करण्यात आल्या आहेत. सदर कारवाई मध्ये पोलीस अधीक्षक, अकोला यांनी स्वतः सहभाग घेवुन नाकाबंदी पॉईंट चेक केले. स्थानिक गुन्हे शाखेचे पो. नि शंकर शेळके यांनी त्यांच्या पथकासह शहरामध्ये नविन वर्षाच्या स्वागत समारंभा स्थळी भेटी देवुन कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घेतली.
अकोला पोलीस दलाच्या वतीने सर्व नागरीकांना नववर्षाच्या शुभेछा देत कायद्याचे पालन करावे, सजक आणि सुरक्षित राहावे कोणताही अनुचित प्रकार घडल्यास तात्काळ पोलीसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक, अकोला यांनी केले आहे.










