अकोला(प्रतिनिधी)– पोलीस स्टेशन हिवरखेड जि. अकोला येथे दिनांक २५.१२.२०२५ रोजी फिर्यादी पोहेकॉ विजय बाबाराव सोळंके ब.न. २००२ पोलीस स्टेशन हिवरखेड जि. अकोला सोबत पोस्टाफ असे पोलीस स्टेशन परिसरात पॅट्रोलींग करीता असतांना फिर्यादी यांना गुप्त बातमीदाराने दिलेल्या बातमीवरुन फिर्यादी यांनी पोस्टाफ व दोन पंचाचेसह आरोपीच्या राहत्या घरी संभाजी नगर हिवरखेड येथे जावुन रेड कार्यवाही केली असता सदर गुन्हयातील महिला आरोपी हिने नागरीकांचा व पशु पक्षांचा जिव जाण्या इतपत गंभीर दुखापत व सदोष मनुष्यवध होईल याची जाणीव असतांना सुद्धा प्रतिबंधीत केलेला नायलॉन चायनीज मांजा विकी करीता जवळ बाळगुन अवैध्यरित्या स्वतःच्या आर्थिक फायदयासाठी विक्री करीत असतांना मिळुन आल्याने पोहेकॉ विजय बाबाराव सोळंके ब.न. २००२ पोलीस स्टेशन हिवरखेड जि. अकोला यांनी दिलेल्या लेखी रिपोर्ट वरुन पोलीस स्टेशन हिवरखेड जि. अकोला येथे अपराध कमांक ३९५/२०२५ कलम ११०,२२३ भारतीय न्याय संहिता सहकलम ४,५, १५ पर्यावरण संरक्षण अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्हयातील महिला आरोपी आरोपीस अटक करण्यात आली असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोपाल गिलबिले, पोलीस स्टेशन हिवरखेड जि. अकोला हे करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक तसेच अपर पोलीस अधीक्षक रेड्डी उपविभागीय पोलीस अधिकारी अकोट, उपविभाग अकोट, तथा सहा. पोलीस अधीक्षक निखील पाटील यांचे मार्गदर्शनाखाली हिवरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन राठोड, पोलीस उपनिरीक्षक गोपाल गिलबिले, पोहेकॉ गणेश साबळे, पोहेकॉ प्रफुल पवार, पोहेकॉ विजय सोळंके, पोहेकॉ रविंद्र रंधे, पोकों अमोल बुंदे, मपोकॉ रेणुका पाबळे, मपोकॉ अश्विनी करवते, मपोकों खुशी धरमकर यांनी केली.









