पातूर(सुनिल गाडगे)- पातुर येथे दसऱ्याला परंपरेनुसार जगदंबा देवीची रात्रभर पातुर शहरातील मुख्य मार्गावर पालखी सोहळा निघत असतो शहरातील गुरुवार पेठ व भगत वेटाळ येथील जगदंबा देवी ही सुवर्ण नदीच्या मिश्री बाबा दर्ग्याजवळ जाऊन त्या ठिकाणी मोठी महाआरती होत असते परंतु या ठिकाणी या जागेवर विशिष्ट समाजाचे चार चाकी वाहने उभी केली होती त्यामुळे महाआरतीला अडथळा निर्माण झाला होता . नागरिकांनी घटनास्थळी वाहने हठविण्याची विनंती केली असता शहरातील एका उपद्रवी व्यक्तीने नागरिकांना अप शब्दाचा वापर केल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली याबाबत पालखी मार्ग मिरवणुकीच्या सदस्यांनी पातुर पोलिसांना याची माहिती दिली परंतु कोणत्या प्रकारचा पातूर पोलिसांनी पाठपुरावा न केल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटला सदर घटनेचा उपद्रव होऊ नये याकरिता जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांना त्या घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरल्याने मोठा जमाव तयार झाला होता त्यामुळे संपूर्ण परिसरात शांततापूर्ण तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती . या घटनेची दखल घेत पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी घटनास्थळी उपविभागीय अधिकारी पडघन हे दाखल झाले घटनेच्या गंभीर पाहून उपद्रवी वाहने हटविणे सुरू केले. सदर कार्यवाही रात्री दोन वाजेपर्यंत चालली होती.
चौकट
घटनास्थळी जिल्हा पोलीस उपाधीक्षक कृष्णकुमार रेड्डी व गुन्हे अन्वेषण शाखेचे ठाणेदार शंकरराव शेळके ,बाळापुर ठाणेदार झोडगे ,आरसीएफ तुकडी दाखल झाल्याने या परिसरात छावणीचे स्वरूप झाले होते
पातुर शहरात दसरा या सणाच्या दिवशी मोठ्या प्रमाणात तणावाची परिस्थिती झाल्याने भाजपा खासदार श्री अनुप धोत्रे आमदार श्री रणधीर भाऊ सावकर यांच्या पाठपुराव्याने दंगल ग्रस्त स्थिती असताना मोठा अनर्थ टळला.
पातुर पोलीस स्टेशनमध्ये चमचीगिरी करण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याने चमचीगिरी करणारे स्वतःला पोलीस पेक्षा मोठे समजून नागरिकांमध्ये दहशत पसरविण्याचा प्रयत्न करीत असतात अशा चमच्यांचा जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी वेळीच आवर घालून त्यांच्यावर कठोर कारवाई करणे गरजेचे