• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, March 17, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

तेल्हारा तालुक्यामध्ये सेवा पंधरवडा होणार साजरा,तहसिलदार समाधान सोनवणे यांचे आवाहन

Our Media by Our Media
September 10, 2025
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, ठळक बातम्या, महाराष्ट्र, राज्य, विदर्भ
Reading Time: 1 min read
114 2
0
तेल्हारा तालुक्यामध्ये सेवा पंधरवडा होणार साजरा,तहसिलदार समाधान सोनवणे यांचे आवाहन
17
SHARES
825
VIEWS
FBWhatsappTelegram

तेल्हारा (आनंद बोदडे)- महसूल व वन विभागाचे शासन निर्णयान्वये अकोला जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा मीना, व अकोटचे उपविभागीय अधिकारी मनोज लोणारकर यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत राष्ट्रनेता प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांचे जन्मदिन दि, 17 सप्टेंबर 2025 ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दि. 2 ऑक्टोंबर 2025 या कालावधीमध्ये तेल्हारा तालुक्यात सेवा पंधरवाडा साजरा करण्यात येणार आहे, पंधरवाड्यात पहिल्या टप्प्यामध्ये दि. 17 ते 22 सप्टेंबर पर्यंत पांदण रस्ते, ग्रामीण भागात जाण्याचे गाडी मार्ग व पायमार्ग शेतावर जाण्याचे मार्ग या रस्त्याचे सिमांकन करणे व त्यांना विशिष्ट क्रमांक देणे बाबतची कार्यपद्धती निश्चित करण्यात आलेल्या दि. 29 ऑगस्ट 2025 च्या शासन निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

तेल्हारा तालुक्यातील सर्व 108 गावांमध्ये या अभियान अंतर्गत तेल्हारा तालुक्यातील प्रत्येक गावातील ग्राम महसूल अधिकारी, ग्राम सेवक, महसूल सेवक व त्यागावचे पोलीस पाटील यांच्या मदतीने स्थानिक नागरिकासह गाव नकाशावर उपलब्ध असलेले वापरात असलेले परंतु गाव नकाशावर नसलेले तसेच शिवरस्ते अशा सर्व प्रकारच्या रस्त्याची दि. 10 सप्टेंबर 2025 पासून पाहणी करून नोंदणी करण्यासाठी शिवार फेरी आयोजित करण्यात आलेली आहे. सदर यादी तयार झाल्यानंतर गावनिहाय तयार करण्यात आलेली रस्त्याची प्राथमिक यादी दि. 15 सप्टेंबर रोजी होणाऱ्या ग्रामसभेमध्ये सर्व ग्रामस्थांच्या माहितीसाठी व ग्राम सभेच्या मान्यतेसाठी ठेवण्यात येईल, सभेच्या मान्यतेनंतर अंतिम झालेल्यानुसार भूमी अभिलेख विभागामार्फत सीमांकन करून अतिक्रमण असल्यास ते निष्कासित करून प्रत्येक रस्त्याला विशिष्ट सांकेताक कोड देण्यात येईल त्याच्या नोंदी सातबारा निस्तारपत्रक वाजिबउल अर्ज, गाव नमुना नंबर 1 (फ) मध्ये घेण्यात येतील.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तरी तेल्हारा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी या अभियानामध्ये शिवार फेरी मध्ये सहभाग नोंदवुन आपल्या शेतीशी संबंधित सर्व प्रकारचे पांदण शेती रस्त्याची पाहणी करून नोंदी करून घ्याव्यात सिमांकन व विशिष्ट क्रमांक प्राप्त करून घ्यावेत, असे याद्वारे आवाहन समाधान सोनवणे तहसीलदार तेल्हारा यांनी केले आहे.

Previous Post

जिल्हाधिकाऱ्यांकडून जिल्हा वार्षिक योजनेचा आढावा मान्यतांची कार्यवाही तत्काळ पूर्ण करा – जिल्हाधिकारी वर्षा मीना

Next Post

तेल्हारा पोलिसांचा समाजासमोर आदर्श : चक्क बैलगाडीतून बाप्पाची मिरवणूक

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
तेल्हारा पोलिसांचा समाजासमोर आदर्श : चक्क बैलगाडीतून बाप्पाची मिरवणूक

तेल्हारा पोलिसांचा समाजासमोर आदर्श : चक्क बैलगाडीतून बाप्पाची मिरवणूक

पत्रकाराला धमकावणाऱ्या “त्या मुजोर” ठेकेदारावर गुन्हे दाखल करा

पत्रकाराला धमकावणाऱ्या "त्या मुजोर" ठेकेदारावर गुन्हे दाखल करा

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.