अकोला(प्रतिनिधी) – अकोला जिल्हयातील पोलीस अधीक्षक मा. श्री. अर्चित चांडक साहेब यांचे आदेशानुसार पोलीस निरीक्षक मनोज बहुरे यांनी शहर वाहतुक नियंत्रण शाखे मार्फत शहरातील बेशिस्त ऑटो रिक्षा चालक यांचेवर मोटार वाहन कायदया प्रमाणे कार्यवाही करण्याकरीता अकोला शहरात दिनांक ३०/०७/२०२५ रोजी विशेष मोहीम राबवुन कारवाई केली..
सदर विशेष मोहीम दरम्यान शहर वाहतुक नियंत्रण शाखे मधील पोलीस अधिकारी व अमंलदार यांनी बसस्थानक चौक, रेल्वेस्टेशन चौक व शहरातील मुख्य चौकामध्ये वाहतुक नियमांचे उल्लंघन करणारे ऑटो रिक्षा चालकांवर पुढील मो. वा. का. अंतर्गत कार्यवाही करण्यात आली, १) अवैध प्रवासी वाहतुक १४-केसेस, २) पुढील सिटवर प्रवासी बसविणे २७-केसेस, ३) सिग्नल जम्पींग २७-केसेस, ४) परवाना सोबत न बाळगने ०२-केसेस, ५) विना गणवेश ऑटो चालविणे ५८-केसेस, ६) कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी वाहन सोडुन जाणे ०२-केसेस, ७) विना नंबर प्लेट वाहन चालविणे ०१-केस असे एकुण १११ केसेस करून १,८१,४०० रू दंड आकारण्यात आला आहे.
तरी वाहतुक शाखे मार्फत आवाहन करण्यात येत आहे की, ऑटो रिक्षा चालक यांनी वाहतुक नियमांचे उल्लंघन करू नये, उल्लघन केल्यास त्यांचेवर मोटार वाहन कायदया नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच ऑटो चालवितांना सोबत वाहनांचे कागदपत्रे बाळगावे, गणवेश परीधान करावे, क्षमतेपेक्षा जास्त शाळकरी मुलांची वाहतुक करू नये, परवान्या पेक्षा जास्त प्रवासी वाहतुक करू नये व वाहतुक नियमांचे तंतोतंत पालन करावे व आपले वाहनावर पेंडीग दंड असल्यास त्वरीत वाहतुक पोलीस किंवा शहर वाहतुक कार्यालय येथे दंड भरावे.