अकोला (प्रतिनिधी) – १८ मार्च रोजी फिर्यादी मतीन अहमद खान मोहम्मद इरफान खान अकोला यांनी पो.स्टे. सिटी कोतवाली अकोला येथे फिर्याद दिली होती यामध्ये फिर्यादी यांनी आयशा प्लाझा अपार्टमेंट समोर आपली गाडी उभी केली असतांना कोणीतरी अज्ञात ईसमाने सदरची मोटार सायकल चोरून नेली. अशा फिर्यादीचे रिपोर्ट वरून पो.स्टे. सिटी कोतवाली, अकोला येथे गुन्हा दाखल करण्यात येऊन पुढील तपास करण्यात आला.
सदर गुन्हयाचे तपासात पो.स्टे. सिटी कोतवाली, अकोला येथील डि.बी. पथकाने गुप्तबामीदाराकडुन मिळालेल्या माहिती वरून सदर गुन्हयात आरोपी नामे ईस्तीयार खान ईलीयास खान, वय २६ वर्षे रा. फिरदौस कॉलनी, अकोला यास निष्पन्न करून सदर आरोपीकडुन वर नमुद गुन्हयातील चोरी गेलेली अॅक्टीव्हा कंपनीची मोटार सायकल ही जप्त करण्यात आली आहे. तसेच पो.स्टे. रामदासपेठ, अकोला येथे दाखल असलेले गुन्हे १) अप क १४७/२०२४ कलम ३७९ भादंवी मधील हिरोहोन्डा स्प्लेन्डर मोटार सायकल कं MH-30-BR-4351 कि.अं. ४०,००० रू. २) अप क १५९/२०२५ कलम ३०३ (२) भारतीय न्याय संहिता मधील एक्टीव्हा कंपनीची मोटार सायकल कं MH-30-Z-6173 कि.अं. ४०,००० ३) अप क २२९/२०२५ कलम ३०३ (२) भारतीय न्याय संहिता मधील एक्टीव्हा कंपनीची मोटार सायकल कं MH-30-AR-0452 कि.अं. ३०,००० रू अशा ईतर गुन्हयातील ०३ चोरीच्या मोटार सायकली जप्त करण्यात आले आहे. अशा प्रकारे सदर आरोपीकडुन पो.स्टे. सिटी कोतवाली व पो.स्टे. रामदासपेठ, अकोला येथे दाखल असलेले ०४ मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणुन सदर गुन्हयातील चोरी गेलेल्या ०४ मोटार सायकली एकुण कि. अं. १,२५,००० रू चा मुदद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही ही मा. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेडड़ी,उपविभागीय पोलीस अधिकारी, शहर विभाग, अकोला सतीष कुळकर्णी यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशन सिटी कोतवाली, अकोला येथील पोलीस निरीक्षक संजय गवई व पो.स्टे.डि. बी. पथकाचे सहा. पोलीस उपनिरीक्षक महेंद्र बहादुरकर, पोहवा. अश्वीन सिरसाट, पोहवा. अजय भटकर, पोहवा. ख्वाजा शेख, पोहवा. किशोर येउल, पोकॉ. निलेश बुंदे व पोकॉ. शैलेश घुगे यांनी केली आहे. तसेच सदर गुन्हयाचा तपास पोलीस अंमलदार पोहवा. अश्वीन सिरसाट हे करत आहेत.