तेल्हारा(प्रतिनिधी)- दि.२२/०४/२०२५ रोजी सहायक पोलीस अधिक्षक अकोट यांना मिळालेल्या गोपनीय बातमी वरून पोलीस स्टेशन तेल्हारा हद्दीतील ग्राम उकळी बाजार येथे देशी व विदेशी दारू विकी करणा-या ईसमावर धडक कार्यवाही करून दारू विक्री करणारा आरोपी नामे लक्ष्मण गुलाब अंभोरे वय ६५ वर्ष रा.उकळी बाजार ता तेल्हारा यांना रंगेहाथ पकडण्यात आले. नमुद आरोपीचे ताब्यातुन व घटनास्थळावरून १) देशी दारू लावणी संत्रा कंपनीचे १८० एम. एल.चे १४० नग कि अं ७० प्रमाणे ऐकुन कि. ९८००/- रूपये २) ROYAL STAG कंपनीचे १८० एमएल चे १० नग कि अं १९० प्रमाणे ऐकुन कि १९००/- रूपये ३) MC DOWELLS NO 1 ORIGINAL कंपनीचे १८० एमएलचे ३० नग १६० रू प्रमाणे ऐकुन ४८००/- रूपये ४) BLACK DELUXE WHISKY कंपनीचे १८० एमएल चे २६ नग किं १४० रू प्रमाणे ऐकुन कि ३६४०/- रूपये असा ऐकुन २०१४० रूपयेचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत पोलीस स्टेशन तेल्हारा येथे गुन्हा दाखल करन्यात आला.
सदरची कार्यवाही मा.श्री बच्चनसिंह पोलीस अधिक्षक,अभय डोंगरे अप्पर पोलीस अधिक्षक,अनमोल मित्तल सहा. पोलीस अधिक्षक अकोट तथा उपविभागीय पोलीस अधिकारी अकोट यांचे मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी अकोट यांचे पथकाने ईश्वर दिनबंधू भारसाकळे पो.स्टे तेल्हारा,पोका राम भंगाळ, पोका संतोष मात्रे ,पोका विजय तायडे, पोका नितीन तेलगोटे,मपोका दिव्या शेळके,मपोका वैष्णवी जाधव यांनी केली.