पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने ७० किंवा त्याहून अधिक वयाच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना आयुष्मान भारत वय वंदना कार्ड देण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. ज्येष्ठांसाठी बहुप्रतिक्षित आयुष्मान भारत आरोग्य विमा सुरू करण्याची घोषणादेखील सरकारने केली. या अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना ५ लाख रुपयांपर्यंत मोफत वैद्यकीय उपचार मिळणार आहेत. ज्येष्ठ नागरिकांना ५ लाख रुपयांचा आरोग्य विमा मिळविण्यासाठी जाणून घ्या नोंदणी कशी करावी?.
आधार कार्डमध्ये नोंदवलेल्या वयानुसार ज्येष्ठ व्यक्तीचे वय ७० वर्षे किंवा त्याहून अधिक असणे आवश्यक आहे, असा पात्रतेचा एकमेव निकष आहे. पात्र ज्येष्ठ नागरिकांसाठी नाव नोंदणी आणि आयुष्मान कार्ड जारी करण्यासाठी आधार-आधारित ई-केवायसी अनिवार्य आहे. आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना नाव नोंदणीसाठी आधार हे एकमेव कागदपत्र आहे.
आयुष्मान भारत योजने अंतर्गत देशातील प्रत्येक उत्पन्न गटातील सर्व लोकांना आरोग्य विमा संरक्षण दिले जाईल. यासाठी पात्र लोकांना पीएम जनआयोग योजना https://beneficiary.nha.gov.in/ च्या अधिकृत वेबसाइटवर किंवा आयुष्मान ॲपच्या मदतीने अर्ज करता येईल.
आयुष्मान वय वंदना कार्ड असे मिळेल मोफत
- राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण https://beneficiary.nha.gov.in च्या अधिकृत वेबसाइटवर.
- आयुष्मान ॲपद्वारे https://play.google.com/store/apps/details?id=com.beneficiaryapp&hl=en_IN&pli=1
नॅशनल हेल्थ अथॉरिटी (NHA) वेबसाइटवरून रजिस्ट्रेशन करा
- आयुष्मान ॲप डाउनलोड करा
- लाभार्थी म्हणून लॉगिन वर क्लिक करा
- तुमची सर्व माहिती प्रविष्ट करा आणि प्रमाणीकरण मोड निवडा आणि पुन्हा प्रविष्ट करा’ आणि लॉगिन क्लिक करा.
- लाभार्थी तपशील, आधार तपशील प्रविष्ट करा
- लाभार्थी न आढळल्यास, eKYC साठी प्रक्रियेचे अनुसरण करा. OTP साठी संमती द्या.