• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, May 7, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी देशाचे ५१ वे सरन्यायाधीश म्हणून घेतली शपथ

Our Media by Our Media
November 11, 2024
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, ठळक बातम्या, महाराष्ट्र, राज्य, राष्ट्रीय, विदर्भ
Reading Time: 1 min read
89 0
0
न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी देशाचे ५१ वे सरन्यायाधीश म्हणून घेतली शपथ
13
SHARES
639
VIEWS
FBWhatsappTelegram

डॉ. डी. वाय. चंद्रचूड यांच्या निवृत्तीनंतर न्यायमूर्ती संजीव खन्ना  यांनी आज (११ नोव्हेंबर) देशाचे ५१ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. न्या. खन्ना यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शपथ दिली. राष्ट्रपती भवन येथे झालेल्या या शपथविधी समारंभावेळी देशाचे मावळते सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड उपस्थित आहेत. न्यायमूर्ती संजीव खन्ना यांना वकिलीचा वारसा त्यांचे वडील देवराज खन्ना यांच्याकडून मिळाला. देवराज खन्ना दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश राहिले आहेत. तर संजीव खन्ना यांचे काका हंसराज खन्ना हे सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती होते. निवृत्त सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा कार्यकाळ २ वर्षांचा होता. नवे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांचा कार्यकाळ केवळ ६ महिने असेल. १३ मे २०२५ रोजी ते सरन्यायाधीश पदावरुन निवृत्त होतील.

तीस हजारी न्यायालय ते सर्वोच्च न्यायालय

न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी १९८३ मध्ये दिल्ली विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली. पुढे न्यायमूर्ती खन्ना यांनी दिल्लीच्या तीस हजारी न्यायालयातून वकिलीला सुरूवात केली. त्यानंतर ते आयकर विभाग आणि दिल्ली सरकारच्या नागरी प्रकरणांचे वकीलही होते. २००५ साली संजीव खन्ना दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती झाले. तब्बल १३ वर्षे दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती राहिल्यानंतर खन्ना यांना २०१९ मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून बढती मिळाली. त्यांच्याकडे संवैधानिक कायदा, कर आकारणी, लवाद, व्यावसायिक कायदा आणि पर्यावरण कायदा यासह विविध कायदेशीर क्षेत्रांतील कामाचा अनुभव आहे. न्यायमूर्ती खन्ना यांनी आयकर विभागाचे वरिष्ठ स्थायी वकील म्हणूनही काम केले आहे.

हेही वाचा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

सर्वोच्च न्यायालयात ६ वर्षे काम

सर्वोच्च न्यायालयातील ६ वर्षांच्या कारकिर्दीत न्यायमूर्ती खन्ना यांनी ४०० पेक्षा अधिक न्यायपीठांचा भाग म्हणून काम केले. या वर्षी जुलैमध्ये न्यायमूर्ती खन्ना आणि न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठाने दिल्लीचे तत्कालिन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर केला होता. अलीगढ मुस्लिम विद्यापीठाला अल्पसंख्याक दर्जा देण्याचे समर्थनही त्यांनी केले होते. आतापर्यंत परंपरेनुसार सर्वोच्च न्यायालयातील अनुभवाच्या आधारे सर्वात ज्येष्ठ न्यायमूर्ती सरन्यायाधीश बनतात.

Previous Post

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या कामकाजाचा शेवटचा दिवस : १० नोव्हेंबरला होणार निवृत्त

Next Post

शासकीय शिष्यवृत्ती योजनेमुळे ‘ओबीसीं’ च्या परदेशी शिक्षणाची स्वप्नपूर्ती

RelatedPosts

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल
अकोला जिल्हा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Next Post
देवेंद्र फडणवीस

शासकीय शिष्यवृत्ती योजनेमुळे 'ओबीसीं' च्या परदेशी शिक्षणाची स्वप्नपूर्ती

पेन्शन

पेन्शनधारकांनो, घरबसल्या सादर करा जीवन प्रमाणपत्र

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.