तेल्हारा(प्रतिनिधी)- देशासह राज्यात बलात्काराच्या घटना घडत असतांना आज अकोला जिल्ह्यातील तेल्हारा पोलीस स्टेशन अंतर्गत एका आठ वर्षीय बालिकेवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार तेल्हारा तालुक्यातील एका गावात आठ वर्षीय बलिकेवर बलात्कार केल्याची घटना काल दि.10 ऑक्टोबर रोजी घडली पीडित बलिकेच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार त्यांना तीन मुली असून शेत मजुरीचे काम करतो. सकाळी शेतात कामाकरिता गेलो सायंकाळी आम्ही सर्व जण घरी आलो असता आठ वर्षीय मुलगी हिने शेजारी राहत असलेल्या आरोपी नामे निलेश शशिकांत दामोदर वय 29 वर्ष याने केलेल्या कृत्याची सर्व आपबीती सांगितली.
याआधी सुद्धा दि. 8 ऑक्टोबर रोजी सुद्धा अशाच प्रकारचे कृत्य या नराधमाणे केले होते तेव्हा आरोपींच्या घरच्यांनी समजूत काढल्याने तक्रार दिली नव्हती मात्र दि. 10 ऑक्टोबर रोजी पुन्हा तेच कृत्य केल्याने काल रात्री उशिरा पीडित बलिकेच्या आईने पोलीस स्टेशन गाठत तक्रार दाखल केली त्यावरून तेल्हारा पोलीस ठाण्यात पॉस्को सह बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित बलिकेला वैद्यकीय तपासणी करिता जिल्हा स्त्री रुग्णायल अकोला येथे पाठवण्यात आले असून आरोपीला अटक करण्यात आली आहे आज अकोट न्यायालयात हजर करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद उलेमाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निलेश ठाकरे करीत आहे.