अकोला :- सबऑर्डिनेट इंजिनियर्स असोसिएशन अकोला यांच्यावतीने हॉटेल हेरिटेज अकोला येथे आयोजित अभियंता दिन २०२४ या कार्यक्रमात महावितरणच्या नाशिक परिमंडलाचे जनसंपर्क अधिकारी श्री. विकास आढे यांनी केलेल्या महावितरण मध्ये करीत असलेल्या उत्कृष्ट कार्यासाठी अभियंता मित्र गौरव म्हणून त्यांचा सन्मान करण्यात आला.
पारस औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता श्री. शरद भगत, सबऑर्डिनेट इंजिनियर असोसिएशनचे राज्य सरचिटणीस संतोष खुमकर यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला. यावेळी मंचावर वाशिम मंडळाचे अधीक्षक अभियंता श्री. अजय शिंदे, अकोला मंडळाचे प्रभारी अधिक्षक अभियंता श्री. गोरक्षनाथ सपकाळे आणि महापारेषणच्या अकोला मंडळाचे अधीक्षक अभियंता श्री. संजय काटकर यांचेसह मान्यवर उपस्थित होते. महावितरणच्या सेवा कालावधीत विकास आढे यांनी विविध सेवा आणि योजना विविध माध्यमातून नियमितपणे सकारात्मकतेने मांडून ग्राहक आणि महावितरण यांचा संपर्क आणि सुसंबंध असावे यासाठी नेहमीच प्रयत्नरत आहेत. सेवा काळात त्यांनी कल्पकतेने राबविलेल्या अभिनव प्रयोग, विविध योजना व मोहिमा यांचेमुळे अभियंता आणि ग्राहक यांना लाभ झाला आहे.
अभियंताप्रती असलेली त्यांची सद्भावना, सहकार्य व तळमळ याकरीता अशाप्रकारे प्रथमच अभियंता मित्र म्हणून गौरव करीत असल्याचे सब ऑडिट इंजिनियर असोसिएशनचे सरचिटणीस संतोष खुमकर यांनी सांगितले. महावितरण मध्ये जनसंपर्क अधिकारी म्हणून सेवा देत असताना विविध माध्यमातून ग्राहकांपर्यंत विविध सेवा व योजना पोहोचविता आल्या आणि ग्राहकांच्या अडचणी, तक्रारी आणि अपेक्षा पोहोचवून निराकरण करण्याकरिता वरिष्ठांनी मदत केली. यासाठी सर्व वरिष्ठ प्रशासन, अभियंते तथा प्रिंट व इलेक्ट्रॉनिक माध्यमकमींनी सहकार्य केल्यामुळे ग्राहक, अभियंते आणि कर्मचारी यांना लाभ झाला आहे. पुरस्कारामुळे आणखी गतिमानतेने सेवा करण्याची ऊर्जा प्राप्त झाली असून या सन्मानाबद्दल सबऑर्डिनेट इंजिनियर असोसिएशनचे विकास आढे यांनी आभार मानले. अभियंता दिन कार्यक्रमाला कार्यकारी अभियंते, अभियंते तथा त्यांचे कुटुंब बहुसंख्येने उपस्थित होते.