पातूर (सुनिल गाडगे): यावर्षी सुद्धा दरवर्षीच्या परंपरेनुसार श्रावण महिन्याच्या दुसऱ्या श्रावण सोमवारी दि. 12 ऑगस्ट रोजी “जय भोले नाथ “च्या गजरात भव्य दिव्य कावड यात्रा महोत्सव साजरा करण्यात आला असून यामध्ये श्री.सिदाजी महाराज, व मंगेश गाडगे मित्र मंडळाच्या वतीने भव्य दिव्य कावड यात्रेणे सहभाग नोंदवून आयोजन करण्यात आले होते. पातुर पासून जवळच असलेल्या मोर्णा धरणा मधून कावड द्वारे जल आणून श्री. संत सिदाजी महाराज यांना जलाभिषेक करण्यात आला आहे. सदर कावड यात्रा ही मंगेश गाडगे मित्रपरिवार यांच्या मार्गदर्शनात ढोणे नगर पातूर सुरवात झाली. यावेळी संत श्री सिदाजी महाराज यांच्या पूजनाने आणि गोपाल राऊत, वसंतराव लखाडे महाराज, पातुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हनुमंत टोपेवार, गणेश सांगळे,पवन वर्गे ,मंगेश गाडगे यांनी पालखीचे पूजन करून सदर कावड यात्रा ही तुळसाबाई कावल विद्यालय चौक, संभाजी चौक, जुने बस स्थानक, गुरुवार पेठ, गुजरी बाजार, पाटील मंडळी, बाळापूर वेस, येथून येऊन श्री संत सिदाजी महाराज मंदिरात जलाभिषेक करून कावड यात्रेचे विसर्जन करण्यात आले.
सदर कावड व पालखीचे संभाजी चौक,पातुर येथे प्रकाश तायडे, बळीराम सिरस्कार, भैय्यासाहेब बडगर, राजेश चव्हाण, कृष्णा अंधारे, शिवकुमार बायस, सतीश सरोदे, बाळू उगले, पंकज चहाकर, करण सिंह गहलोत, नाना देशमुख, गजानन गाडगे, प्रफुल कुरई, सचिन ढोणे, मयूर इंगळे, प्रवीण इंगळे, भूषण इंगळे, चंद्रकांत भारताशे, गोपाल हरणे, विजय म्हैसणे, संतोष सावंत, सुरेश श्रीनाथ, अर्जुन टप्पे, अनिल राठोड, प्रणव तायडे, किशोर काळदाते, या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पालखीचे भव्य दिव्य स्वागत करून महाआरती करण्यात आली.संभाजी चौक येथेच महा प्रसादाचे आयोजन करून पालखीमध्ये सर्व सहभागी नागरिकांनी व मंगेश गाडगे मित्रपरिवाराने महाप्रसादाचा लाभ घेतला. व टी. के. व्ही चौकामध्ये सचिन गिऱ्हे, नितीन बारताशे, विशाल तेजवाल कैलास बगाडे, तुषार शेवलकर, सचिन तायडे, यांच्याकडून पालखीतील सहभागी नागरिकांना उसळ वाटप करण्यात आली. सर्वात महत्त्वाचे अमरावती येथून आणलेली भव्य दिव्य हनुमान जी यांची मूर्ती व आई तुळजाभवानी ची मूर्ती पालखी कावड यात्रेचे आकर्षण ठरले. सदर कावड यात्रेकरिता अकोला, वाशिम,बुलढाणा, अमरावती यवतमाळ व पातुर तालुक्यातील हजारो नागरिकांनी सहभाग घेतला. अथक परिश्रम घेतले. सदर पालखी कावड यात्रा यशस्वी होण्याकरिता व मंगेश गाडगे मित्रपरिवार यांनी अथक परिश्रम घेतले.