पातूर(सुनिल गाडगे)- पातुर तालुक्यातील चान्नी खेट्री तांदळी बू. सस्ती सुकळी सांगोळा चतारी आदी परिसरात वृक्ष लागवडीत मोठ्या प्रमाणात घोळ प्रकरणाची चौकशी होत नसल्याने मंगेश धोत्रे यांनी २० मे रोजी गटविकास अधिकारी व संबंधित वरिष्ठ अधिकार्याकडे तक्रार केली होती. तसेच गेल्या काही दिवसापूर्वी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुनील फाटकर व जिल्हा परिषद सदस्य चंद्रशेखर चिंचोळकर यांनी २२ मे रोजी जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेमध्ये वृक्ष लागवडीत घोळ सुरू असल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. वृक्ष लागवडीत घोळ प्रकरणाची चौकशीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी समिती गठित केली होती. मात्र दोन आठवडे उलटूनही राजकीय दबावामुळे अद्यापही चौकशी करण्यात आली नाही, असा आरोप करण्यात आला, वृक्ष लागवडीत घोळ लपविण्यासाठी उलट चौकशी आधी अनेक ठिकाणी वृक्ष लगवड करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणाची चौकशी होत नाही तो पर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा इशारा उपोषणकर्ते मंगेश धोत्रे यांनी दिला आहे.यावेळी सावन गवई, सागर गवई, विजय हातोले, संदीप लांडे, शेख साजिद आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
पातूर तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत हद्दीत वृक्ष लागवडीत घोळ सुरू आहे. याबाबतच्या तक्रारीवरून समिती गठीत झाली मात्र दोन आठवडे उलटूनही अद्यापही चौकशी करण्यात आली नाही,चौकशी होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवू मंगेश धोत्रे उपोषणकर्ता चौकशी करण्यास विलंब का? पातुर तालुक्यात वृक्ष लागवडीत घोळ प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले मात्र दोन आठवडे उलटूनही चौकशी करण्यास विलंब का होत आहे. असा प्रश्न उपस्थित झाला आहे.