पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल उद्या दि.21मे रोजी दुपारी एक वाजता जाहीर करण्यात येणार असल्याचे राज्य मंडळाने जाहीर केले आहे.
या वेबसाईटवर पाहता येणार निकाल
- www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर निकालासोबतच निकालाची संख्यिकीय माहिती उपलब्ध होईल. तसेच
- www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.
ऑनलाईन निकालानंतर बारावीच्या परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांना स्वतः च्या अनिवार्य विषयापैकी कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तर पत्रिकेच्या छायाप्रत मागणीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. गुणपडताळणी आणि उत्तर पत्रिका छाया प्रतीसाठी बुधवार दिनांक २२/०५/२०२४ ते बुधवार दिनांक ०५/०६/२०२४ पर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज करून शुल्क भरता येणार असल्याचे राज्य मंडळाने स्पष्ट केले आहे.