अकोला,दि.1: महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रातर्फे जिल्हा उद्योग केंद्राच्या सहकार्याने शेतकरी व इच्छूक युवकांसाठी पाच दिवसांचे शेळीपालन व पशुपालन सशुल्क प्रशिक्षण अकोला येथे आयोजित करण्यात येत आहे. इच्छूकांनी दि. 4 फेब्रुवारीपूर्वी नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शेतीपूरक व्यवसायाच्या दृष्टीने शेळीपालन, पशुपालनासाठी उपयुक्त जाती, शासनाच्या कर्ज योजना, व्यक्तिमत्व विकास, मार्केटिंग, प्रकल्प अहवाल आदींची माहिती तज्ज्ञांद्वारे देऊन पूरक व्यवसायासाठी प्रोत्साहित करणे हा प्रशिक्षणाचा उद्देश आहे. प्रशिक्षणासाठी प्रवेश मर्यादा 25 असून, किमान सातवी उत्तीर्ण व वय 18 ते 50 वर्षांदरम्यान असलेल्या व्यक्तीला प्रवेश मिळू शकेल.
इच्छूकांनी कार्यक्रम आयोजक कु. प्रिया बडगे, जिल्हा उद्योजकता विकास केंद्र, द्वारा जिल्हा उद्योजकता केंद्र, भूविकास बँक पहिला मजला, जुने पोलीस अधिक्षक कार्यालयाजवळ, अकोला (भ्रमणध्वनी : 8446948704) येथे संपर्क साधावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी प्रसन्न रत्नपारखी यांनी केले आहे.