• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, March 5, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

हिवरखेडवासी पुन्हा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व प्रशासनाला आपल्या रक्ताने पत्रे लिहिणार.!

Our Media by Our Media
January 30, 2024
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, ठळक बातम्या, महाराष्ट्र, राज्य, राष्ट्रीय, विदर्भ
Reading Time: 1 min read
139 2
0
बोनस, वेतनवाढ च्या हपत्या करीता वीज कर्मचारी 14 नोव्हेंबर पासून संपावर, तेल्हारा येथे कर्मचारी चे निदर्शने
21
SHARES
1k
VIEWS
FBWhatsappTelegram

हिवरखेड : मागील 24 वर्षांपासून नगरपंचायत अथवा नगरपरिषदची मागणी पूर्ण होत नसल्याने आता यासाठी पुन्हा हिवरखेड वासियांचे रक्त वाहणार असल्याचे बोलले जात आहे. विदर्भातील सर्वात मोठी असलेली हिवरखेड ग्रामपंचायत नगरपंचायत / नगरपरिषद व्हावी यासाठी मागील 24 वर्षांपासून नागरिकांचा शांततामय मार्गाने अविरत संघर्ष सुरू आहे. सर्व प्रक्रिया पूर्ण होऊनही शासन जाणीवपूर्वक नगरपरिषद ची अंतिम अधिसूचना काढण्यास विलंब करीत आहे. यासाठी आतापर्यंत अनेक आंदोलने, आमरण उपोषणे, अन्नत्याग आंदोलन, निदर्शने, प्रदर्शने, इच्छामृत्यू परवानगी, आत्मदहन इशारा, मूक मोर्चा, मुंडण आंदोलन, बाजारपेठ बंद, रक्तसंकल्प अभियान, अशी अनेक प्रकारची आंदोलने झाली.

एवढेच नव्हे तर हिवरखेड वासीयांनी आपल्या रक्ताने मुख्यमंत्र्यांना व संबंधितांना पत्र सुद्धा लिहिली होती. त्याची दखल घेत शासनाने तात्काळ हिवरखेड नगरपंचायतची उद्घोषणा केली होती. परंतु त्यानंतर ज्यांना हिवरखेड नगरपंचायत नको होती त्या व्यक्तींनी हिवरखेड नगरपंचायत वर स्थगिती आणण्यात यश मिळविले होते. त्यानंतरही हिवरखेडच्या नागरिकांनी लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा सुरूच ठेवला. लोकांच्या मागणीची दखल घेत आमदार अमोल मिटकरी यांनी याविषयी अनेकदा विधिमंडळात आवाज उचलला तसेच आमदार भारसाकडे यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांना नगरपरिषद करण्याबाबत पत्र दिले होते. सामूहिक पाठपुराव्यानंतर हिवरखेड नगर परिषद ची उद्घोषणा सुद्धा शासनाने केली. त्यासाठी सर्व प्रक्रिया पूर्ण केलेली असून जिल्हाधिकारी व संबंधित लोकप्रतिनिधींची ना हरकत सुद्धा शासनाला दिलेली आहे. परंतु त्याला मोठा कालावधी उलटून गेला असतानाही शासन अजूनही कुंभकर्णी झोपेत असल्यामुळे शासनाला जागे करण्यासाठी आणि येत्या आठवडाभरात हिवरखेड नगरपरिषदची अंतिम अधिसूचना काढण्याच्या मागणीसाठी हिवरखेड वासियांच्या रक्ताच्या धारा पुन्हा वाहणार असल्याची चर्चा आहे. यासाठी हिवरखेडच्या जागरूक नागरिकांतर्फे आणि विविध सामाजिक संघटनांमार्फत लवकरच भव्य रक्तदान शिबिर आयोजित करून रक्तदान केले जाणार आहे. ज्याच्या माध्यमातून शेकडो जणांचे अनमोल प्राण वाचविण्याचे पुण्यकर्म केले जाणार असून हा शासनाला गांधीगिरी मार्गाने संदेश दिला जाणार आहे. सोबतच हिवरखेड वासियांच्या स्वतःच्या रक्ताने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, संबंधित मंत्री, संबंधित प्रशासकीय अधिकारी, व इतर वरिष्ठांना रक्तरंजित पत्र लिहिण्यात येणार आहे. असा मानस महात्मा गांधीजींच्या पुण्यतिथीच्या दिवशी हिवरखेड नगरपंचायत / नगरपरिषद समर्थकांनी बोलून दाखविला. त्यामुळे शासनाने जाणीवपूर्वक विलंब न करता तात्काळ हिवरखेड नगरपरिषदची अंतिम अधिसूचना येत्या आठवडाभरात जाहीर करावी आणि हिवरखेड ग्रामपंचायत बरखास्त करावी अशी जागरूक नागरिकांकडून जोरदार मागणी होत आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसहिता लागण्यापूर्वी हिवरखेड नगरपरिषद न झाल्यास लहान मोठ्या सर्वच स्तरातील लोकप्रतिनिधींना जनतेच्या रोशाचा सामना करावा लागेल अशी दाट शक्यता दिसून येत आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Previous Post

पेन्शन अन् बँकेच्या नियमात बदल, रक्कम काढण्यावर मर्यादा

Next Post

अकोला जिल्ह्यातील २५ हजार घरांवर होणार ‘ सूर्योदय ‘ योजनेतून ऊर्जानिर्मिती

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
अकोला जिल्ह्यातील २५ हजार घरांवर होणार ‘ सूर्योदय ‘ योजनेतून ऊर्जानिर्मिती

अकोला जिल्ह्यातील २५ हजार घरांवर होणार ' सूर्योदय ' योजनेतून ऊर्जानिर्मिती

Draupadi Murmu

मोदी सरकारचा १० वर्षांचा लेखाजोखा.! राष्ट्रपतींच्या अभिभाषणातील १० प्रमुख मुद्दे

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.