‘गदर २’ चित्रपटाने पहिल्याच दिवशी गर्दी खेचायला सुरूवात केली आहे. तारा सिंहने बॉक्स ऑफिसवर असा धमाका केला आहे, ज्यामुळे पुढील काही काळापर्यंत त्याची आठवण राहणार आहे. तब्बल २२ वर्षानंतर आलेल्या ‘गदर’च्या सिक्वेलने पहिल्याच दिवशी चित्रपटगृहाबाहेर प्रेक्षकांच्या रांगा लावल्या. ‘गदर २’ ने पहिल्याच दिवशी रेकॉर्डतोड ओपनिंग केली आहे.
सनी देओलच्या तारा सिंह अवतारच्या पुनरागमनाने पुन्हा एकदा चित्रपटगृहांना तुफान कमाईचे दिवस दाखवले आहेत. तब्बल २२ वर्षानंतर परतेल्या या अभिनेत्याने बॉक्स ऑफिसवर राज्य करायला सुरूवात केली आहे. २००१ मध्ये आलेल्या ‘गदर’ चा सीक्वल २२ वर्षानंतर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. लोकांना या चित्रपटाच्या बक्कळ कमाईची आशा होती, मात्र या चित्रपटाची कमाईची सुरूवात इतकी धडाकेबाज असेल असे वाटले नव्हते.
शुक्रवारी चित्रपटगृहात रिलीज झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी मनापासून प्रेम दिले. यामुळे चित्रपटगृहाबाहेर लोकांच्या रांगा लागल्याचे दिसून आले. चित्रपटगृहांमध्ये तारा सिंहच्या आगमनानंतर मोठ्या कालावधीनंतर पुन्हा एकदा ‘हाउसफुल’ चे बोर्डही दिसून आले. दिल्ली-मुंबई सारख्या मोठ्या शहरांसोबतच पटना-गोरखपूर सारख्या छोट्या शहरांमध्येही एक पडदा चित्रपटगृहांमध्ये चित्रपटाची धूम दिसून आली. याचे परिणाम आज (शनिवार) सकाळी दिसून यायला लागले. ट्रेंड रिपोर्टनुसार ‘गदर २’ चित्रपटाने पहिल्याच दिवशी या वर्षीचा दूसरा सर्वात मोठ्या प्रमाणात ओपनिंग कलेक्शन केले.
गदर 2′ चे ओपनिंग कलेक्शन
पहिल्या दिवशी ‘गदर २’ ची ॲडव्हान्स बुकींग चांगली होती. फक्त नॅशनल चेन्समध्ये २ लाख ८० हजारहून अधिक, तर एकुण ७ लाखाहून अधिक ॲडव्हान्स तिकिट्ससह ‘गदर २’ चित्रपटगृहात रिलीज झाली. असे मानण्यात येत आहे की, पहिल्या दिवशी चित्रपटाची कमाई ३० कोटी रूपयांपर्यंत पोहचू शकते. ट्रेंड रिपोर्टनुसार ‘गदर २’ चित्रपटाने पहिल्या दिवशी ३० ते ४० कोटी रूपयांपर्यंतचा गल्ला जमवला आहे. ‘गदर २’ ने सनी देओलला त्याच्या करिअर मधील सर्वात मोठी ओपनिंग दिली आहे. पहिल्याच दिवशी चित्रपटाचे कलेक्शन हे ४० कोटी रूपयांपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे असे मानण्यात येत आहे की, हा चित्रपट शनिवार आणि रविवार मिळून १०० कोटी रूपयांची कमाई करेल. त्यामुळे सनी देओलचे बॉक्स ऑफिसवरचे हे रेकॉर्ड जास्त काळापर्यंत स्मरणात राहणार आहे.