२०२० मध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) जे काही घडलं त्यामुळे आमचा विश्वास तुटला आहे. दोन्ही देशांमधील सार्वजनिक आणि राजकीय आधार कमकुवत झाला आहे, अशा शब्दांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी चिनी समकक्ष वांग यी यांना सुनावले. सोमवार २४ जुलै रोजी दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्ग येथील फ्रेंडस् ऑफ ब्रिक्समधील बैठकीवेळी ते बोलत होते.
सोमवारी जोहान्सबर्ग येथे झालेल्या बैठकीत डोवाल यांनी सीमावर्ती भागात शांतता प्रस्थापित करण्यासाठी सतत प्रयत्न करण्याच्या महत्त्वावर भर दिला. द्विपक्षीय संबंध सामान्य होण्याच्या मार्गात येणारे अडथळे दूर करता येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. दोन्ही देशांमधील सामरिक परस्पर विश्वास वाढवावा, सहमती आणि सहकार्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि त्याच वेळी अडथळे दूर केले पाहिजेत. द्विपक्षीय संबंध लवकरात लवकर मजबूत करून त्यांना स्थिर विकासाच्या मार्गावर आणण्याबाबतही यावेळी चर्चा झाली. भारत-चीन द्विपक्षीय संबंध केवळ दोन्ही देशांसाठीच नव्हे तर जगासाठीही महत्त्वाचे असल्याचेही या चर्चेत नमूद करण्यात आले.
सीमा प्रश्नाला संपूर्ण द्विपक्षीय संबंधांमध्ये “योग्य ठिकाणी” ठेवले पाहिजे, तर दोन्ही देश व्यापारासारख्या इतर क्षेत्रात प्रतिबद्धता पुढे नेतात, असे चीने म्हटले होते. हे भारताने पूर्णतः नाकारले आहे आणि वांग यांच्या भेटीदरम्यान डोभाल यांची टिप्पणी या भूमिकेचा पुनरुच्चार होता. पुढच्या महिन्यात होणाऱ्या ग्रुपिंगच्या शिखर परिषदेच्या तयारीचा भाग म्हणून ब्रिक्स NSA च्या बैठकीत सहभागी होण्याव्यतिरिक्त, डोवाल जोहान्सबर्गमध्ये त्यांच्या अनेक समकक्षांसोबत स्वतंत्र बैठका घेणार आहेत.
की वांग यी हे कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना (CPC) च्या पॉलिटिकल ब्युरोचे सदस्य आहेत. तसेच चीनच्या विदेशी व्यवहार संबंध आयोगाचे ते संचालकही आहेत. विशेष म्हणजे भारत आणि चीन यांच्यात सीमेवर शेवटची विशेष प्रतिनिधी स्तरावरील चर्चा २०१९ मध्ये झाली होती.