अकोला, दि.20 : अकोला राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियान राबविले जात आहे. त्याअनुषंगाने इंडियन आईल कॉर्पोरेशन लिमिटेड अकोला डेपो यांनी बाळापुर तालुक्यातील 20 रुग्णांना दत्तक घेतले आहे. त्यांनी निक्षय मित्र बनुन 20 क्षयरुग्णांना सहा महिने पोषण आहार किटचे वाटप इंडियन ऑइल कार्पोरेशन अकोला डेपोचे वरिष्ठ डेपो प्रबंधक मनीष प्रताप व सुरक्षा ऑफिसर सागर शर्मा यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, माता बाल संगोपन अधिकारी डॉ. विनोद करंजीकर, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.मनीष शर्मा यांच्यामार्फत बाळापूर तालुक्यातील गरजवंत क्षयरोग रुग्णांना पोषण आहार किट वितरित केल्या जाणार आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा पीपीएम समन्वयक वसंत उन्हाळे, लेखापाल कोंडबा खूपसे, संजय घाटोळे, भरत जाधव यांचे सहकार्य लाभले.