अकोला दि. 18 : राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम व राष्ट्रीय तंबाखु नियंत्रण कार्यक्रमातंर्गत जागतिक तंबाखु दिनानिमित्त पंचायत समिती, अकोला येथे आरोग्य तपासणी शिबीरांचे आयोजन करण्यात आले. यावेळी येथील अधिकारी व कर्मचारी यांचे उच्चरक्तदाब, मधुमेह व मौखिक आरोग्य तपासणी करण्यात आले.
आरोग्य विभागाचे उपसंचालक तथा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे व आरएमओ डॉ. भावना हाडोळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिबीरांचे आयोजन करण्यात आले. या शिबीरात जिल्हा तंबाखु नियंत्रण कक्षाचे जिल्हा सल्लागार डॉ. प्रिती कोगदे यांनी तंबाखु मुक्त गाव करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. एनसीडीचे जिल्हा समन्वयक डॉ. आशिष गिऱ्हे यांनी उच्चरक्तदाब, मधुमेह व जीवनशैली सुधारणेबाबत माहिती दिली. तर डॉ. शितल मस्के यांनी मुख कर्करोगाविषयी माहिती देऊन मौखिक आरोग्य तपासण्या केल्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धम्मसेन शिरसाट, जानराव अवघड, ममता ठाकरे, नंदन चौरपगार, प्रतिभा तिवाणे यांनी परिश्रम घेतले.