अकोला- पोलीस स्टेशन रामदास पेठ जि. अकोला येथे दिनांक २७.०४.२०२३ रोजी फिर्यादी सुबोध महादेव समुदरे वय ४० वर्षे व्यवसाय रेल्वे लिपीक यांनी तक्रार दिली की त्यांचे नातेवाईकांचे लग्न असल्याने ते दिनांक २२.०४.२०२३ रोजी सकाळी लग्ना करीता शासकीय निवासस्थानाला कुलुप लावुन कुटुंबासह बाहेरगावी गेले होते. दिनांक २४.०४.२०२३ रोजी घरी परत आले असता घराचा दरवाजा उघडा दिसला व घरातील सोनी कंपनीचा टि.व्ही., सिलाई मशिनचे मुंडके, लहान मुलांची सायकल व नगदी २,०००/- रू असा एकुण ४६,०००/- रू चा मुद्देमाल अज्ञात चोराने चोरून नेल्याचा रीपोर्ट दिल्याने पो स्टे रामदासपेठ अज्ञात आरोपी विरूध्द अप क्रमांक १६३/२०२३ कलम ४५४, ४५७, ३८० भादंवि अन्वये गुन्हा नोंद करून तपासात घेतला.
सदर गुन्हा उघडकीस आणन्याकरीता पोलीस निरीक्षक मनोज बहुरे पोलीस स्टेशन रामदास पेठ यांनी त्यांचे गुन्हे शोध पथकाचे अमंलदार यांना मार्गदर्शन करून सुचना दिल्या व १२ तासाचे आत तपास पथकाने गुन्हयाचा छळा लावुन गुन्हयातील आरोपी मोसीन शेख फारूक वय २८ वर्षे रा. तारफैल सिध्दार्थ नगर अकोला ह. मु. शंकर नगर अकोला यास ताब्यात घेवुन त्यास विचारपुस केली असता त्याने सदर गुन्हयाची कबुली दिल्याने नमुद आरोपीला सदर गुन्हयात अटक करून त्याचे जवळुन गुन्हयात चोरी गेलेला ४६,०००/- रू मुद्देमाल हस्तगत केला.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री. संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती मोनिका राउत मॅडम, सहा. पोलीस अधीक्षक गोकुळ राज यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मनोज बहुरे पोलीस स्टेशन रामदास पेठ यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस अमंलदार विजय सावदेकर, तोहीद अली काझी, शिवम दुबे, स्वप्नील चौधरी यांनी केली.