• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, March 26, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

सामाजिक न्याय समता पर्व;समाजकल्याण कार्यालयात मार्गदर्शन कार्यशाळा

Our Media by Our Media
April 7, 2023
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, कार्यक्रम, ठळक बातम्या, फिचर्ड, बातम्या आणि कार्यक्रम, राज्य, विदर्भ
Reading Time: 1 min read
81 1
0
सामाजिक न्याय समता पर्व
12
SHARES
587
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि. 7 :- येथील समाज कल्याण कार्यालयात सामाजिक न्याय समता पर्वांतर्गत मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत शेतीसंबंधित योजना व सामाजिक न्याय विभागाच्या योजनाची माहिती व मार्गदर्शन करण्यात आले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे ‘न्याय समता पर्वा’अंतर्गत एक दिवशीय कार्यशाळा पार पडली. यावेळी जिल्हा जात पडताळणी कार्यालयाचे उपायुक्त उमेश सोनोने, जिल्हा परिषद कृषी अधिकारी जयंत सोनोने, बार्टीचे विजय बेदरे, समाजकल्याण विभागाचे विशेष अधिकारी प्रदिप सुसतकर, कार्यालय अधिक्षक आर.एस.ठाकरे, रावसाहेब बोदळणकर, निरीक्षक उमा जोशी, प्रसाद सुर्यवंशी,  जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाचे वाघमारे, आदि उपस्थित होते.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

 मार्गदर्शन कार्यशाळेत उपायुक्त उमेश सोनोने यांनी रमाई घरकुल योजना व कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेसदंर्भात माहिती दिली. तसेच  अनुसूचित जाती घटकांतील गरजू लाभार्थ्यांनी सामाजिक न्याय विभागासोबतच इतर विभागाच्या योजनांची माहिती करुन घ्यावी. या योजनाची तळागावाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी उपस्थितांनीही सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी केले.  महामानवांचे विचार आपल्या जिवनात आत्मसात करण्यासाठी वाचन करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन उमेश सोनोने यांनी केले.

 कृषी अधिकारी जयंत सोनोने यांनी कृषी स्वालबंन योजनेची माहिती उपस्थित लाभार्थ्यांना दिली. सामाजिक न्याय विभागाच्या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना शेतजमिन उपलब्ध करुन दिली आहेत. या जमिनीवर पिकांचे सुयोग्य व्यवस्थापन व आर्थिक नियोजन केल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्नात वाढ होवून कूटूंबाचे राहणीमान उचांवण्यास मदत होईल. शेतजमिनीमध्ये पारंपारीक पिकासोबत फळशेती, चंदन लागवड, फळभाजी इत्यादी पिके घेतल्यास बारामाही आर्थिक उत्पनाचे साधन मिळू शकते, असेही प्रतिपादन जयंत सोनोन यांनी केले. यावेळी लाभार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देऊन त्यांचे समाधान केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यांत आले. कार्यशाळेचे प्रास्ताविक विशेष अधिकारी प्रदीपजी सुसतकर यांनी केले.  कार्यक्रमाचे सुत्रसंचालन समतादुत प्रज्ञा खंडारे यांनी तर आभार प्रदर्शन वैशाली गवई यांनी केले. या कार्यक्रमाकरीता सामाजिक न्याय विभागातील अधिकारी व कर्मचारी तसेच शासकीय वसतिगृहातील गृहपाल, स्वाभिमान योजना व रमाई आवास योजनेचे बहुसंख्येने लाभार्थी उपस्थित होते.

Previous Post

‘आनंदाचा शिधा’ वितरणास प्रारंभ; जिल्ह्यात 3 लाख 31 हजार लाभार्थ्यांना मिळणार लाभ

Next Post

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला कोविड उपाययोजना संदर्भात आढावा

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
कोविड उपाययोजना आढावा बैठक

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला कोविड उपाययोजना संदर्भात आढावा

राज्यात पुढच्या ४८ तासांत मुसळधार पावसाचा इशारा

Yellow Alert : महाराष्ट्र, तेलंगणा, ओडिशाला दोन दिवस 'येलो अलर्ट'; वादळी वाऱ्यासह गारपिटीचा इशारा

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.