• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, March 11, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

अवकाळी पाऊस; संयुक्त पंचनामे प्रगतिपथावर:नैसर्गिक आपत्तीचे गांभिर्य ओळखून वेळेत पंचनामे पूर्ण करा- जिल्हाधिकारी

Our Media by Our Media
March 20, 2023
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, कार्यक्रम, ठळक बातम्या, फिचर्ड, बातम्या आणि कार्यक्रम, राज्य, शेती
Reading Time: 1 min read
84 0
0
अवकाळी पाऊस; संयुक्त पंचनामे प्रगतिपथावर:नैसर्गिक आपत्तीचे गांभिर्य ओळखून वेळेत पंचनामे पूर्ण करा- जिल्हाधिकारी
12
SHARES
603
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला दि.२० -:  जिल्ह्यात नुकत्याच अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे झालेल्यानुकसानीचे संयुक्त पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी क्षेत्रीय यंत्रणेला दिले आहेत. संपकाळात नैसर्गिक आपत्ती ध्यानात घेऊन कर्मचाऱ्यांनी लवकरात लवकर संयुक्त पंचनामे पूर्ण करावे असेही जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

जिल्ह्यात गेल्या दि.६ पासून वेगवेगळ्या दिवशी विविध क्षेत्रात अवकाळी पाऊस, गारपीट या नैसर्गिक आपत्तीचा तडाखा बसत आहे. यासंदर्भात आपत्ती व्यवस्थापन कक्षातून प्राप्त माहितीनुसार, जिल्ह्यात बार्शी टाकळी, पातूर, तेल्हारा या तीन तालुक्यात या आपत्तीची झळ बसली आहे. त्यात बार्शी टाकळी तालुक्यातील १०, पातूर तालुक्यातील २३ तर तेल्हारा तालुक्यातील १७ अशा एकूण ५० गावांमध्ये नुकसान झाले आहे. तीनही तालुके मिळून ३७२१ शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक पंचनाम्यात दिसून आले आहे. एकूण ३४७६.१७ हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाले आहे. आतापर्यंत १९ गावांचे पंचनामे पुर्ण असून १२३७ शेतकऱ्यांचे ७९७.१७ हेक्टर क्षेत्रावरील पंचनामे पूर्ण झाले आहेत,अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

दरम्यान, नुकसानग्रस्त भागात महसूल, कृषी व ग्रामविकास विभागाने संयुक्त पंचनामे पुर्ण करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आज सकाळी आढावा बैठक घेतली. नैसर्गिक आपत्तीचा प्रसंग लक्षात घेऊन क्षेत्रीय कर्मचाऱ्यांनी आपले पंचनाम्याचे काम वेळेत पुर्ण करावे व यंत्रणांनी अहवाल सादर करावा, असे निर्देश दिले.

आस्ट्ल शिवार पाहणी

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

जिल्ह्यात कर्मचाऱ्यांच्या संपामुळे शासकीय कार्यालयांच्या कामकाजावर झालेल्या परिणामांबाबत जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आज आढावा घेतला. या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, जिल्हा कृषी विकास अधिकारी डॉ. मुरली इंगळे, जिल्हा कोषागार अधिकारी मनजीत गोरेगावकर, जिल्हा नियोजन अधिकारी गिरीश शास्त्री, उपप्रादेशीक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे, जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. आरती कुलवाल तसेच विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

जिल्ह्यात आरोग्य सेवा, अत्यावश्यक सेवा यांबाबत आढावा घेण्यात आला. अत्यावश्यक सेवांमध्ये कोणताही खंड पडणार नाही याची खबरदारी घ्यावी. नैसर्गिक आपत्तीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत उद्भवलेली कामे यंत्रणेने वेळेत पूर्ण करणे अपेक्षित आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

जिल्हाधिकारी नुकसानग्रस्तांच्या शेतात

दिलेल्या निर्देशानुसार कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी निमा अरोरा व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. मुरली इंगळे यांनी गारपीटग्रस्त भागाची आज सायंकाळी पाहणी केली. पातूर तालुक्यात दि.१७ व १८ मार्च दरम्यान मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्याने पिकांचे नुकसान झाले होते.भेटी दरम्यान पातूर तहसीलदार दीपक बाजड, तालुका कृषी अधिकारी पातूर, मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, तलाठी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक, व नुकसानग्रस्त शेतकरी उपस्थित होते. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जिल्हाधिकारी श्रीमती अरोरा यांनी धीर दिला. तसेच तात्काळ पंचनामे करण्यासाठी आदेशीत केले. यावेळी मौजे आस्टुल,कोठारी खु, कोठारी बु,आस्टूल, पास्टूल शिवार या शिवारात त्यांनी सायंकाळी उशीरापर्यंत पाहणी केली.

Previous Post

Old Pension Scheme : महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे

Next Post

‘तेजस्विनी’ बचतगटांच्या उत्पादनांचे प्रदर्शन अकोला येथे शुक्रवार (दि.२४)पासून

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
TEJSVINI

‘तेजस्विनी’ बचतगटांच्या उत्पादनांचे प्रदर्शन अकोला येथे शुक्रवार (दि.२४)पासून

पत्रपरिषद

पत्रपरिषद: बचतगटांच्या उत्पादनांचे ‘तेजस्विनी’ प्रदर्शन; प्रदर्शनाचा लाभ घेऊन महिला आर्थिक सक्षमीकरणाच्या चळवळीला पाठबळ द्यावे -उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.