अकोला दि.१७ :- अमरावती विभागीय महसूल आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी आज अकोला येथे विविध विषयांचा आढावा घेतला.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीस जिल्हाधिकारी निमा अरोरा, मनपा आयुक्त कविता द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, अपर जिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मुकेश चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपजिल्हाधिकारी गजानन सुरंजे, सदाशिव शेलार, बाबासाहेब गाढवे, जिल्हा नियोजन अधिकारी गिरीश शास्त्री, मनपा व जिल्हा मुख्यालयातील अन्य विभागप्रमुख उपस्थित होते.
मनपा, नगरपालिका क्षेत्रातील मुलभूत सोई सुविधा विकास अंतर्गत करावयाच्या विकासकामांबाबत त्यांनी आढावा घेतला. त्यात महापालिकेच्या यंत्रणेमार्फत करावयाची कामे व सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करावयाची कामे अशा दोन यंत्रणांमार्फत माहिती सादर करण्यात आली. याबाबत त्यांनी आढावा घेतला. तसेच आर्थिक वर्ष समाप्तीच्या अनुषंगाने महसूल, जिल्हा नियोजन समितीचा निधी, घरकुल निधी इ. बाबत आढावा त्यांनी घेतला. कर्मचारी संपाच्या पार्श्वभुमिवर अत्यावश्यक सेवांबाबत खबरदारी घ्यावी,अशा सुचनाही त्यांनी केल्या.