अकोला,दि. 6 :- संत रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेस निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील संदीप साबळे, अनिल अंधारे, संजय अंबलकार व निरज बोबडे आदि उपस्थित होते.