अकोला,दि. 4 :- महिला व बालविकास विभाग, जिल्हा बाल संरक्षण कक्ष व सखी वन स्टॉप सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने बार्शीटाकळी तालुक्यातील माझोड व कापशी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना कायदेविषयी जनजागृती करण्यात आली. यामध्ये पॉक्सो कायदा, चाईल्ड लाईन 1098, बालकांचे हक्क व अधिकार याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शीका बालकल्याण समितीचे अध्यक्ष अॅड. अनिता गुरव शिंदे यांनी बालकांना बालकांचे हक्क व अधिकार याबाबत मार्गदर्शन केले. तर बालकल्याण समितीचे सदस्य प्रांजली जयस्वाल यांनी सोशल मिडीयामुळे होणारे दुष्परीणाम, घ्यावयाची काळजी याबाबत माहिती दिली.
कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विलास मरसाळे, जिल्हा परीवीक्षा अधिकारी गिरीश पुसदकर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजु लाडुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वंदना देशमुख यांनी केले. यावेळी कापशी ग्रामपंचायतीचे सरपंच सुनिता विठ्ठल चतरकर, मुख्याध्यापक भानुदार येन्नेवार, शिक्षक, अंगणवाडी सेवीका, ग्रामसेवक, कापशी ग्रामपंचायत सदस्य व विद्यार्थी आदि उपस्थित होते.