तेल्हारा (आनंद बोदडे)- तेल्हारा येथिल अनंतराव भागवत मंगल कार्यालय तेल्हारा येथे दि.२२ जानेवारी रोज रविवारी होणाऱ्या बौध्द धम्मिय उपवर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन भिमशक्ती बहुउद्देशिय संस्थेच्या वतीने घेण्याचे ठरविले असुन या मेळाव्या करीता जास्तीत जास्त उपवर-वधु व नागरीकांनी उपस्थित राहुन आपला वेळ आणी पैसा वाचवावा.
या मेळाव्याकरीता निवासी उपजिल्हाधिकारी प्रा.संजय खडसे, उपआयुक्त अण्णासाहेब बोदडे, प्रभाताई सिरसाट महीला आघाडी जिल्हाअध्यक्षा, पुष्पाताई इंगळे माजी जिल्हापरिषद अध्यक्ष, प्रतिभाताई भोजने, आम्रपालीताई खंडारे समाज कल्याण सभापती, पोलीस निरिक्षक सेवानंद वानखडे, राहुल आठवले, विनोद विरघट राज्य विक्रीकर अधिकारी, डाॕ.संतोष येवलीकर तहसिलदार तेल्हारा, आम्रपाली गवारगुरु सभापती पंचायत समिती तेल्हारा, डाॕ.दिलीप हिरोळे सेवानिवृत्त गटविकास अधिकारी ,वंचित बहुजन महीला आघाडीच्या कल्पनाताई हिवराळे सुनीताताई हिरोळे प्रा.रणजीत इंगळे, जेष्ठविचारवंत भिमराव परघरमोल कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ समाज सेवक शंकरराव पोहरकार हे उपस्थीत राहाणार आहेत.
तरी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भिमशक्ति बहुउद्देशिय संस्थेंचे जेष्ठ कार्यकर्ते विलास पोहरकार,बाळासाहेब बोदडे माजी सैनीक . कैलासचंद्र भोजने सामाजीक कार्यकर्ते केले आहे.