अकोला, दि.10 :- जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय व इनरव्हील क्लब ऑफ क्वीन्स अकोला याच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. 8 जानेवारी रोजी ‘बेटी बचाओ’ जनजागृतीकरिता मॅरेथान रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीला आरोग्य विभागाच्या उपसंचालक डॉ. तरंगतुषार वारे व निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी हिरवी झेंडी दाखवून रवाना केले.
मॅरेथॉन रॅली वसंत देसाई स्टेडियम येथून सकाळी सात वा. सुरु झाली. यामध्ये जिल्हा क्रिडा अधिकारी संतोष भट, महिला व बालविकास अधिकारी विलास मरसाळे, जिल्हा स्त्री रुग्णालयाचे स्त्री रोग तज्ञ डॉ. वंदना पटोकार, वैजयंती पाठक, तसेच सर्व शासकीय कार्यालयाचे अधिकारी कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, महाविद्यालयातील विद्यार्थी व नागरिकांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला होता.
ही रॅली वसंत देसाई स्टेडीयमपासून सुरु होवून पोस्ट ऑफिस, सिताबाई महाविद्यालय, रामदासपेठ- कोर्ट मार्गे वसंत देसाई स्टेडियम येथे समारोप करण्यात आला. मॅरेथॅान रॅलीदरम्यान ‘बेटी बचाओ’ या संदेशाचे जनजागृतीपर घोषणाव्दारे नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. मॅरेथॉन रॅली यशस्वी करण्यासाठी डॉ. धनंजय चिमणकर, ॲड. तेजल मेहता, एकता अग्रवाल, ॲड शुभांगी ठाकेरे, डॉ. प्रिती कोगदे, प्रशांत ठाकरे यांनी परिश्रम घेतले.